‘कॉफी विथ अनुष्का’, WTC पराभवाचं दु:ख विसरुन विराट कोहली रोमँटिक डेटवर!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 28 जूनच्या सकाळी ब्रेकफास्ट दरम्यान रोमँटिक डेटवर दिसले. (Virat kohli Coffee With Anushka in England After WTC Final 2021)
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) किवी संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवाचं दु:ख बाजूला सारत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) रोमँटिक डेटवर गेला. सोमवारी तो अनुष्काला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी गेला. तिथे ‘कॉफी विथ अनुष्का’सोबतच उभयतांमध्ये गप्पा रंगल्या. Virat kohli Coffee With Anushka in England After WTC Final 2021
विराटचा अनुष्कासोबत ‘ब्रेकफास्ट’
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 28 जूनच्या सकाळी ब्रेकफास्ट दरम्यान रोमँटिक डेटवर दिसले. अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात कोहलीच्या समोर कॉफीचा कप आहे आणि त्याची पत्नी अनुष्का त्याच्या शेजारी बसली आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘जेव्हा आपण तातडीने ब्रेकफास्टसाठी येतो तेव्हा विजेत्या सारखं फील होतं’…
View this post on Instagram
विराट अनुष्काचे ‘प्रेमाचे बंध’
2013मध्ये एका जाहिरातीच्या सेटवर अनुष्का आणि विराट यांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर त्यांची मैत्री जुळली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि 2017मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. गेली चार वर्ष गोडीगुलाबीने ते सुखाचा संसार करत आहेत. त्यांच्यात तिसरी पाहुणी देखील आली आहे. जानेवारी महिन्यात विराट अनुष्काला कन्यारत्न झालं आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे.
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
WTC अंतिम सामन्यानंतर आता भारतीय संघाला इंग्लंडविरोधात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडला भारताने भारतीय भूमीवर पाणी पाजलं होतं. आता इंग्लंडच्या भूमीत तोच करिश्मा भारतीय संघ करुन दाखवतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
(Virat kohli Coffee With Anushka in England After WTC Final 2021)
हे ही वाचा :
यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल….
पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी