विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय?

टी-20 चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयशी संपर्क साधला, त्यावेळी मी माझी बाजू त्यांना सांगितली. माझ्या निर्णयामागे ही कारणं आहेत, हे मी सांगितलं होतं. चांगल्या पद्धतीने हा निर्णय स्वीकारला गेला.

विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय?
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:30 PM

मुंबई: कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour) रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat kohli) टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून ते वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याबाबतच्या घटनाक्रमावर महत्त्वाची माहिती दिली. विराटने टी-20 चं कर्णधारपद सोडण्याबाबत आज जे पत्रकार परिषदेत सांगितलं, त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निर्णयाचा पूनर्विचार करण्यास सांगितलं नाही

कोहलीने गांगुलीचे वक्तव्य खोडून काढलं. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या माझ्या निर्णयाचा बीसीसीआयने स्वीकार केला. निवड समिती सदस्य किंवा अन्य कोणीही मला माझ्या निर्णयाचा पूनर्विचार करण्यास सांगितले नाही, असे विराट म्हणाला. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडताना विराटने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत पदाधिकारी आणि निवड समिती सदस्यांचा कुठलाही निर्णय आपल्याला मान्य असेल, असे कोहलीने बीसीसीआयला आधीच सांगितले होते. बुधवारी पत्रकार परिषदेत कोहलीने ही माहिती दिली.

“टी-20 चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयशी संपर्क साधला, त्यावेळी मी माझी बाजू त्यांना सांगितली. माझ्या निर्णयामागे ही कारणं आहेत, हे मी सांगितलं होतं. चांगल्या पद्धतीने हा निर्णय स्वीकारला गेला. मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, असे कोणी मला सांगितले नाही” असे कोहली म्हणाला.

“माझा निर्णय योग्य पद्धतीने स्वीकारला गेला. योग्य दिशेने उचलेले पाऊल म्हणून त्याकडे पाहिले गेले. बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल, तर वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा असल्याचे मी सांगितले होते. माझा खूप स्पष्ट संवाद झाला होता” असे कोहली म्हणाला.

गांगुली काय म्हणाला होता?

पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बिलकुल या उलट सांगितलं. “मी विराट कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं. सौरव गांगुलीने न्यूज १८ सोबत बोलताना हे विधान केलं होतं. विराटने मात्र आज वेगळचं सांगितलं. टी-20 चं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवलं नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असं सांगितलं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या: Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’ Virat kohli on odi series: ‘खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा’, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे Virat kohli on odi series: ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध, रोहितची उणीव जाणवेल’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.