विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर संघाच्या नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. विराट कोहली (Virat Kohli) या पदावरुन पायउतार झाला आहे. तो आता क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिलेला नाही.

विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य
Virat Kohli - Ravi Shastri
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 11:55 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर संघाच्या नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. विराट कोहली (Virat Kohli) या पदावरुन पायउतार झाला आहे. तो आता क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिलेला नाही. बीसीसीआयने (BCCI) व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (ODI And T-20) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार बनवलं आहे. परंतु कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. कारण द. आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेली कसोटी मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच निर्णय घेतला. अशातच आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली आणि भारताच्या कर्णधारपदाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

दी इंडियन एक्सप्रेससोबत बोलत असताना शास्त्री म्हणाले की, तो (विराट) अगदी सहजपणे अजून दोन वर्ष भारतीय कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता. पण त्याने आता राजीनामा दिला आहे. आपण त्याच्या या निर्णयाचा आदर करायला हवा. 2021 च्या T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माझी कारकीर्द समाधानकारक

विराट कोहली आणि रवी शास्त्री जेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक होते, तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली, या मालिकेतील अंतिम कसोटी सामना या वर्षाच्या मध्यात खेळवला जाईल. शास्त्री यांनी भारतीय संघातील त्यांचा प्रशिक्षक म्हणून सात वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच या संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

कसोटी कर्णधार कोण?… जाणून घ्या रवी शास्त्रींचे उत्तर

जेव्हा शास्त्री यांना विचारण्यात आले की, टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार कोण असावा? याबाबत त्यांची पहिली पसंती कोणाला आहे? यावर शास्त्री म्हणाले, “सर्वप्रथम, मी सांगेन या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे. मी गेल्या 7 वर्षात जे काही पाहिलं आहे त्यावरून, प्रत्येक नवीन खेळाडू आला आहे तो विलक्षण आहे. कर्णधाराचा विचार केला तर रोहित शर्मा दोन फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. दुखापतीमुळे तो जाऊ शकला नाही ही वेगळी बाब. पण त्याला जर उपकर्णधार बनवलं होतं तर विराट नंतर त्यालाच कर्णधार बनवण्याचाही विचार सुरू आहे.

विराट कोहली

IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’

स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....