विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडेत अर्धशतक झळकावलं. यानंतर आपल्या स्टाईलमध्ये विराटनं हाफसेन्च्युरीचा आनंदही साजरा केला. आपल्या करीअरमधील 64वं अर्धशतक झळकाल्यानंतर विराट कोहलीनं आपल्या बॅटचा चक्क पाळणा केला. विराटनं आपल्या मुलीकडे पाहून अर्धशतक साजरं करताना केलेली ऍक्शन इंटरनेटवरील त्याच्या चाहत्यांना घायाळ करुन गेली. कधी काळी विराट शतकी किंवा अर्धशतकी खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माकडे (Anushka Sharma) बॅट दाखवून फ्लाईंग किस द्यायचा. तेव्हा अनुष्का टाळ्या वाजवून विराटच्या शतकी किंवा अर्धशतकी खेळीचं कौतुक करताना दिसायची. आता मात्र चित्र बदललंय. या बदललेल्या चित्रानं विराटच्या कृतीतही बदल घडवला आहे.
रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान, तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात अखेरच्या षटाकपर्यंत खेळ गेला. रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या चार धावांनी विजय मिळवत आणि भारताला व्हाईट वॉश दिला. पण या सामन्या भारतीय खेळाडूंची कडवी झुंज पाहायला मिळाली. 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांपैकी नुकताच कॅप्टन्सीवरुन पायउतार झालेला विराट कोहली या सामान्यात चांगला फॉर्मात दिसला.
विराट कोहलीनं 84 चेंडूमध्ये 65 धावा केल्या. दरम्यान, आपलं अर्धशतक झाल्यानंतर आनंदीत झालेल्या विराटनं पॅव्हेलियनकडे बॅट दाखवली. यावेळी नेहमीप्रमाणे दिसणारं चित्र काहीसं वेगळं होतं. विराटचं आपली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतली अर्धशतकी खेळी आपल्या मुलीला डेडीकेट केली. अनुष्कासोबत टाळ्या वाजताना विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Virat Kohli dedicated his 50 to his daughter Vamika ❤️#Vamika #ViratKohlipic.twitter.com/IEpYdJz7aJ
— CRICKET VIDEOS ? (@AbdullahNeaz) January 23, 2022
अनेकांनी विराटच्या या बदललेल्या रुपाचं कौतुक केलंय. काही युजर्सनी शेवटी बापाचं काळीज आहे, असं म्हटलंय. तर काहींनी दिवस किती पटकन बदलून जातात, असं म्हटलंय. अनुष्काचा विराटची मॅच अटेंड करतानाचा जुना व्हिडीओही काही रिशेअर केला आहे. तर त्याच व्हिडीओत विराटनं कालच्या अर्धशतकी खेळीनंतर बॅटचा केलेला पाळणाही अनेकांना भुरळ पाडून गेलाय.
Does it ever drive you crazy
Just how fast the night changes? ??❤️#AnushkaSharma #ViratKholi #vamika pic.twitter.com/pFZiI8H3hz— Zoya (@Kattysupremacy) January 23, 2022
वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा
स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’
ICC U19 World Cup: युगांडावरील मोठ्या विजयानंतर क्वार्टर फायनलमध्ये भारत बांगलादेशला भिडणार