IND vs ENG: विराट सेनेने इंग्लंडची पुंगी वाजवली, कोहलीच्या सेलेब्रेशनचा नेमका अर्थ काय?
भारताने इंग्लंडला ओव्हलच्या मैदानात तब्बल 50 वर्षानंतर मात देत इतिहास रचला. या सामन्यात अनेक खास गोष्टी घडल्या यातीलच एक खास गोष्ट म्हणजे विराट कोहलीचं खास सेलेब्रेशन...
लंडन : भारताचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या मैदानावरील आक्रमक अंदाजासाठी ओळखला जातो. सामन्यात कितीही बिकट परिस्थिती असली तरी विराट सर्व संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कायम प्रोत्साहन देताना दिसतो. अनेकजण भारताच्या अलीकडे परदेशात वाढलेल्या विजयाचे श्रेय विराटच्या या जोशपूर्ण व्यक्तीमत्त्वाला देखील देत आहेत. त्यात ओव्हलवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयातही विराटचं खास ‘पुंगी सेलेब्रेशनने’ सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. तर नेमकं असं सेलेब्रेशन विराट का करत होता? आणि त्याचे इंग्लंड फॅन्समध्ये कासे पडसाद उमटले? या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket team) चौथ्या कसोटी सामन्यात ओव्हलच्या मैदानावर (Oval Test) 50 वर्षानंतर एक दमदार विजय मिळवत इंग्लंविरुद्धच्या मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात विजयानंतर तसेच इंग्लंडच्या विकेट पडताना, भारताचा कर्णधार विराट एक खास सेलेब्रेशन करत होता. यामध्ये तो इंग्लंडच्या फॅन्सच्या दिशेने पुंगी वाजवण्याचा इशारा करत होता. इंग्लंडच्या फॅन्सकडे अशाप्रकारे इशारा करण्याला तिसऱ्या कसोटीची पार्श्वभूमी आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला एक डाव आणि 76 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनावेळी इंग्लंडच्या फॅन्सनी भारतीय खेळाडूंना फार चिडवले. ‘इंग्लंड्स बार्मी आर्मी’ या फॅन्सच्या ग्रुपने त्यांची खासियत असणाऱ्या पुंगीप्रमाणे एक वाद्य वाजवत भारतीय संघाला पार जेरीस आणलं होतं. त्यानांच करारा जवाब म्हणून कोहलीने अशाप्रकारचे सेलेब्रेशन केले.
इंग्लंडचे फॅन्स नाराज
विराटच्या अशा प्रकारच्या सेलेब्रेशन नंतर आणि संघाच्या पराभवामुळे इंग्लंड फॅन्स कमालीचे नाराज झाले. अनेकांनी सोशन मीडियावरुन विराटच्या या वागणूकीबद्दल नाराजी व्यक्त करत त्याने असे करणे शोभत नाही असे ज्ञान देखील झाडले. पण इंग्लंडच्या फॅन्सनी दरवेळी भारतीय खेळाडूंप्रति केलेल्या चूकीच्या वर्तणाबद्दल विराटची ही कृती बरोबरचं असल्याचं भारतीय चाहत्यांच म्हणणं आहे. दरम्यान इंग्लंड्स बार्मी आर्मीनेही विराटचा फोटो पोस्ट करत. आम्हाला माहित आहे तुलाही आर्मीत सामिल व्हायचं आहे. असं मजेशीर ट्विट केलं आहे.
Yes we know you want to be in the army Virat. We get the hint ??#ENGvIND pic.twitter.com/lFCk8FCCte
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) September 6, 2021
इतर बातम्या
ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर ‘ओव्हल’ सर
(Virat Kohli Diffrent celebration in Oval Test against England went viral on social media)