IND vs PAK: Virat Kohli मैदानात रडला, पाकिस्तानला हरवल्यानंतर काय झालं?

IND vs PAK: फक्त विराटच नाही, टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू रडला.

IND vs PAK: Virat Kohli मैदानात रडला, पाकिस्तानला हरवल्यानंतर काय झालं?
Virat kohli Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 6:56 PM

मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. विराट कोहली या विजयाचा हिरो ठरला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावून विजय सुनिश्चित केला. विराटने आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जो विजय मिळवून दिलाय, त्याचं महत्त्व शब्दात विषद करता येणार नाही. विराट कोहलीसाठी सुद्धा हा विजय खास आहे. म्हणूनच हा चॅम्पियन खेळाडू विजयानंतर भावूक झाला होता.

आनंदाने आधी उड्या मारल्या, पण नंतर….

रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर विराट कोहली भावूक झाला. आधी तो आनंदाने ओरडला. उड्या मारल्या पण नंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. विराट कोहलीला अनेकदा विजयानंतर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच चॅम्पियन कोहलीच्या डोळ्यात पाणी होतं.

विराटच नाही हार्दिकही रडला

फक्त विराटच नाही, हार्दिक पंड्या सुद्धा भावूक झाला होता. हार्दिक पंड्याचा अश्रूचा बांध फुटला. विजयानंतर हार्दिकने विराटला मिठी मारली. संपूर्ण टीमने या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा दिल्या. कॅप्टन रोहित शर्माने तर विराटला खांद्यावर उचलून घेतलं. रोहितने, विराटची ही करीयरमधील सर्वोत्तम इनिंग असल्याचं म्हटलं आहे.

हरलेली मॅच जिंकून दिली

विराट कोहलीसाठी ही इनिंग खास आहे. कारण एकवेळ पाकिस्तान ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं. भारताने 31 धावात 4 विकेट गमावल्या होत्या. रोहित, राहुल, सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज तंबूत परतले होते. विराटने क्रीजवर आल्यानंतर सेट व्हायला थोडा वेळ घेतला. पण त्याने नंतर हार्दिक सोबत मिळून जे केलं, त्याला तोड नाही. दोघांनी 78 चेंडूत 113 धावा जोडल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.