IND vs SL: Virat Kohli चा लकी फॅन, मैदानात येऊन पाय पकडले, त्यानंतर सूर्याच्या कृतीने जिंकलं मन

IND vs SL: विराट कोहलीसाठी रविवार 15 जानेवारीचा दिवस विशेष होता. तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विराट 166 धावांची शानदार इनिंग खेळला.

IND vs SL: Virat Kohli चा लकी फॅन, मैदानात येऊन पाय पकडले, त्यानंतर सूर्याच्या कृतीने जिंकलं मन
ind vs sl 3rd odiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 9:57 AM

तिरुअनंतपूरम: विराट कोहलीसाठी रविवार 15 जानेवारीचा दिवस विशेष होता. तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विराट 166 धावांची शानदार इनिंग खेळला. कोहलीसाठी कालचा दिवस खास होताच. पण त्याच्या फॅन्ससाठी सुद्धा हा दिवस विशेष होता. त्यांनी या सामन्यात विराटला ‘याची देहा, याची डोळा’ शतक झळकवताना पाहिलं. यात एक चाहत्याच नशीब खूपच विशेष होतं.

त्याचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने 317 धावांनी मोठा विजय मिळवला. विजयानंतर अनेक खेळाडू मैदानात फिरत होते. त्याचवेळी एक मुलगा पळत मैदानात घुसला. विराट कोहलीचा हा युवा फॅन होता. कोहली जवळ जाऊन त्याने त्याचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही वर्षात अनेक चाहत्यांनी कोहली आणि अन्य भारतीय खेळाडूंसाठी अशा प्रकारच प्रेम व्यक्त केलं आहे.

सूर्याच्या कृतीने मन जिंकलं

अन्य फॅन्सच्या तुलनेत या मुलाचं नशीब चांगलं होतं. त्याला फक्त कोहलीला भेटायलाच मिळाल नाही, तर कोहलीसोबत फोटो काढण्याचीही संधी मिळाली. कोहलीने सुद्धा त्याच्या या चाहत्याला निराश केलं नाही. तिथे उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने स्वत: जाऊन कोहलीसोबत त्या चाहत्याचा फोटो काढला. सूर्याने आपल्या या कृतीने अनेकांच मन जिंकलं.

टीम इंडियाचा मोठा विजय

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे सीरीज 3-0 अशी जिंकली. सीरीजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 317 धावांनी मोठा विजय मिळवला. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये धुवाधार बॅटिंग केली. त्याने श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. विराट कोहली नाबाद 166 धावांची इनिंग खेळला. त्याने आपल्या इनिंगमध्ये 13 चौकार आणि 8 षटकार लगावले. विराटच हे कितवं शतक?

त्याने 74 व आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. या सीरीजमधील त्याची ही दुसरी सेंच्युरी आहे. त्याने 85 चेंडूत आपलं 46 व वनडे शतक पूर्ण केलं. कोहलीच्या शतकाची क्रिकेट विश्वात चर्चा सुरुच आहे. पण त्याचवेळी त्याने मारलेल्या एका सिक्सची सुद्धा तितकीच चर्चा आहे. सेंच्युरी मारल्यानंतर त्याने तो सिक्स मारला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.