T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या तोंडी धोनीची भाषा; आता पुढचं लक्ष्य…

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. ग्रुप स्टेजमधून भारतीय संघाला बॅग पॅक करावी लागली आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीने कर्णधार म्हणून शेवटचा टी-20 सामना खेळला.

T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या तोंडी धोनीची भाषा; आता पुढचं लक्ष्य...
Virat Kohli - Team India
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 10:52 AM

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. ग्रुप स्टेजमधून भारतीय संघाला बॅग पॅक करावी लागली आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीने कर्णधार म्हणून शेवटचा टी-20 सामना खेळला. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नामिबियाविरुद्ध खेळला गेलेला शेवटचा T20 सामना 9 गडी राखून जिंकला. या विजयानंतर विराटने अनेक पैलूंवर चर्चा केली. पण, तो धोनीचीच भाषा बोलत असल्याचं पाहून चाहत्यांना बरं वाटलं. विराट मॅचनंतरच्या कॉन्फरन्समध्ये नव्हे तर सोशल मीडियावर धोनीच्या भाषेत व्यक्त झाला. (Virat Kohli follows MS Dhoni’s Word after playing last captaincy match against Namibia)

विराट असं काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी धोनीची भाषा समजून घेतली पाहिजे. IPL 2020 आठवून पाहा, जेव्हा धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाला होती, वाईट कामगिरीमुळे संघावर टीका होत होती. स्पर्धेच्या इतिहासात असे प्रथमच घडले जेव्हा धोनीचा CSK संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. तेव्हा 3 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या टीम चेन्नई सुपर किंग्जसोबत असेच काहीसे घडले. टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर धोनी म्हणाला होता की, “आम्ही जोरदार पुनरागमन करू. वुई विल कम बॅक स्ट्राँगर.”

धोनीची भाषा बोलला, पण आता यश मिळेल का?

आयपीएल 2020 मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर धोनीने जे काही सांगितलं, ते आयपीएल 2021 मध्ये पूर्ण करून दाखवलं. चेन्नईच्या संघाने दमदार पुनरागमन केले. आयपीएल 2021 चा चषक धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने उंचावला. विराट कोहलीही असेच काहीतरी करणार असल्याचे सांगत आहे. नामिबियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर त्याने ट्विट केले आणि लिहिले आहे की, “वुई विल कम बॅक स्ट्राँगर,” याचा अर्थ, आम्ही आणखी मजबूत पुनरागमन करू.आता प्रश्न असा आहे की, 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारत कमबॅक करेल का? भारत विजेतेपद पटकावेल का? सीएसकेप्रमाणे भारतीय संघ पुनरागमन करेल का?

भारत स्पर्धेबाहेर, मात्र शेवट गोड

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकातील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताचं स्पर्धेत पुनरागमन अवघड होतं. पण तिसरा आणि चौथा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारत स्पर्धेत पुनरागमन करत होता. पण त्याचवेळी न्यूझीलंडने सलग चार विजय मिळवत सेमीफायलनमध्ये प्रवेश मिळवला आणि भारत आपोआपच स्पर्धेबाहेर गेला. पण तरी सोमवारी (8 नोव्हेंबर) झालेल्या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. भारताने नामिबीयावर 9 विकेट्सनी तगडा विजय मिळवला आहे.

ग्रुप स्टेजमध्ये भारताने 2 सामने गमावले, 3 सामन्यांत विजय

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. जी अपेक्षा भारताने 8 विकेट्सने स्कॉटलंडला मात देत सामना अवघ्या 6.3 षटकात संपवत पूर्ण केली. पण न्यूझीलंडने भारतापेक्षा अधिक अर्थात 4 विजय मिळवत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, ज्यामुळे भारत आपोआपच स्पर्धेबाहेर झाला.

इतर बातम्या

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

India vs Namibia Toss result: अखेरच्या सामन्यात विराटने जिंकला टॉस, एका बदलासह भारतीय संघ मैदानात

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?

(Virat Kohli follows MS Dhoni’s Word after playing last captaincy match against Namibia)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.