IND VS SA : विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ संपणार, राहुल द्रविडच्या तालमीत विराटचा सराव

सर्व वाईट गोष्टी घडत असल्या तरी विराट कोहली मात्र त्याच्या फॉर्ममुळे सर्वाधिक चिंतेत आहे. गेली दोन वर्ष त्याची बॅट शांत आहे. गेल्या दोन वर्षात त्याने क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेलं नाही.

IND VS SA : विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ संपणार, राहुल द्रविडच्या तालमीत विराटचा सराव
Rahul Dravid, - Virat Kohli
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:55 PM

मुंबई : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या विचित्र परिस्थितीतून जातोय. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याला एकही शतक लागवता आलेलं नाही. तसेच दुसऱ्या बाजूला दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ आयपीएलमध्ये अपयशी ठरला. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने दारुण पराभव गेला. भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. विराटने आधी आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडलं, मग भारताच्या टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं, त्यानंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही त्याने गमावलं आहे. विराट कोहलीने गेल्या काही दिवसांत खूप काही गमावलं आहे. ( Virat kohli getting special batting tips from Rahul Dravid ahead of India vs South Africa Test Series)

या सर्व वाईट गोष्टी घडत असल्या तरी विराट कोहली मात्र त्याच्या फॉर्ममुळे सर्वाधिक चिंतेत आहे. गेली दोन वर्ष त्याची बॅट शांत आहे. गेल्या दोन वर्षात त्याने क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेलं नाही, ना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, ना इंग्लंड दौऱ्यावर, ना न्यूझीलंडच्या दौऱ्यावर. विराट कोहली 70 शतकांवर अडकला आहे. मात्र त्याचा शतकांचा दुष्काळ लवकरच दूर होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत असून भारतीय कसोटी कर्णधार आपल्या शतकांचा दुष्काळ नक्कीच संपवेल अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

विराट कोहलीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली नेटमध्ये जोरदार सराव करत आहे. मोठी गोष्ट अशी आहे की विराट कोहलीचा फलंदाजीचा सराव मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली सुरु आहे, जो कसोटी क्रिकेटमधील भारताच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे.

विराटच्या चुका दुरुस्त करण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न

विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असू शकतो. त्याने आतापर्यंत 70 शतकं झळकावली आहेत, तो खेळाडू म्हणून कितीही मोठा असला तरी त्याच्याकडून चुका नक्कीच होतात. विराटच्या या चुकांवर प्रशिक्षक राहुल द्रविड लक्ष ठेवून आहेत. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली हवेत ड्राईव्ह खेळत आहे, त्यानंतर राहुल द्रविड त्याला काहीतरी समजावून सांगत आहे. विराट कोहली बॅट वेगाने बॉलकडे नेत आहे, कदाचित द्रविड त्याला हलकी बॅट वापरण्याचा सल्ला देत असावा जेणेकरून चेंडू पॉवरऐवजी टायमिंगने सीमापार लगावता येईल.

दक्षिण आफ्रिकेत विराटला बोलबाला

विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेची उसळती आणि वेगवान खेळपट्टी आवडते. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत 5 कसोटी सामन्यात 55.80 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी सामना खेळला तेव्हा त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 96 धावा केल्या होत्या. गेल्या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीने शतक आणि अर्धशतक झळकावले होते. चांगली गोष्ट म्हणजे सेंच्युरियनमध्येच विराट कोहलीच्या बॅटने शतक झळकलं आहे, जिथे यावेळी कसोटी मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट तळपेल आणि त्याच्या शतकांचा दुष्काळही संपेल, अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियासमोर हतबल इंग्लंड पराभवाच्या छायेत

Ind vs SA: केएल राहुल उपकर्णधार झाल्याने मुंबईकर अजिंक्य रहाणेचं संघातील स्थान धोक्यात? 26 डिसेंबरला काय होणार?

ना ‘नो बॉल’, ना ‘डेड बॉल’, फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO

( Virat kohli getting special batting tips from Rahul Dravid ahead of India vs South Africa Test Series)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.