राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा; विराट कोहली म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) राहुल द्रविडला (Rahul Dravid) टी - 20 विश्वचषकानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाण्याच्या शक्यतेवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) राहुल द्रविडला (Rahul Dravid)टी – 20 विश्वचषकानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाण्याच्या शक्यतेवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, “याबाबतीत नेमकं काय घडत आहे, याची मला कल्पना नाही.” (Virat Kohli gives BIG statement over Rahul Dravid taking up Team India head coach role)
महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड सुरुवातीला या जबाबदारीसाठी तयार नव्हता पण बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) याबाबतीत थोडा जोर दिल्यानंतर राहुल द्रविड हे पद स्वीकारण्यास तयार झाल्याचे बोलले जात आहे.
जेव्हा कोहलीला द्रविडला प्रशिक्षक बनवण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “त्या आघाडीवर नेमके काय चालले आहे याची मला कल्पना नाही.” संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांपूर्वी कर्णधारांच्या मीडिया सत्रादरम्यान भारतीय कर्णधार बोलत होता.
भारताच्या महान खेळाडूंपैकी एक 48 वर्षीय द्रविड गेल्या सहा वर्षांपासून इंडिया ‘अ’ आणि अंडर -19 प्रणालीचा प्रभारी आहे. त्याच्या देखरेखीखाली ऋषभ पंत, आवेश खान, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि शुभमन गिल सारख्या खेळाडूंनी त्याच्या देखरेखीखाली कनिष्ठ स्तरापासून राष्ट्रीय संघ किंवा वरिष्ठ स्तरापर्यंतचा प्रवास केला आहे.
द्रविड सध्या बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) दरम्यान तो दुबईत होता आणि भारतीय संघाच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपला माजी सहकारी आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली तसेच बोर्डाचे सचिव जय शाह यांची भेट घेत चर्चा केली.
निवृत्तीनंतर द्रविड तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत
द्रविड टीम इंडियासोबत काम करण्याची ही तिसरी वेळ असेल. अशी गोष्ट सर्वात आधी 2014 मध्ये घडली होती. तेव्हा तो कसोटी मालिकेसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून इंग्लंडला गेला होता. शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफ इंग्लंडमध्ये असल्याने जुलै 2021 मध्ये द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली होती.
रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत
टीम इंडियासोबतचा करार संपल्यानंतर रवी शास्त्री काय करणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. टी – 20 विश्वचषकानंतर, जेव्हा ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडतील, तेव्हा त्यांच्या भविष्याचे काय होईल, यावरुन आता पडदा हटू लागला आहे. रवी शास्त्रींबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचीही योजना स्पष्ट असल्याचे दिसते. राठोड सध्या प्रमोशनकडे डोळे लावून बसले आहेत. ते रवी शास्त्रींची खुर्ची मिळवण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. ते लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती आहे.
रवी शास्त्री यांच्याबद्दल अशी बातमी आहे की, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची खुर्ची सोडल्यानंतर ते कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील होतील किंवा त्यांच्या जुन्या व्यवसायात प्रवेश करतील अर्थात कॉमेंट्री क्षेत्रात.
इतर बातम्या
युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR
टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब
(Virat Kohli gives BIG statement over Rahul Dravid taking up Team India head coach role)