IND vs AUS Final | विराटला सहनच झालं नाही, प्रेजेंटेशनच्यावेळची त्याची एक कृती बनली चर्चेचा विषय, VIDEO
IND vs AUS Final | वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवलं. 241 धावांच्या लक्ष्याचा ऑस्ट्रेलियाने 43 ओव्हरमध्ये यशस्वी पाठलाग केला. ट्रेविस हेडच्या दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहलीला प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळाला.
IND vs AUS Final | वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. फायनलचा निकाल असा असेल? याची कोणीच कल्पना केली नव्हती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच झाली. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून हा सामना जिंकला. सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियन टीमने उचलली. फायनलमध्ये ट्रेविस हेडने शानदार शतक झळकवून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. फायनलमध्ये हेडची बॅट चालली. प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार विराट कोहलीला मिळाला. विराट कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या. हा पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने जे केलं ते चर्चेचा विषय बनलय.
विराट कोहलीला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला. पण वर्ल्ड कप जिंकता न आल्याने तो दु:खी होता. विराट कोहली स्टेजवरुन थेट खाली उतरला. तो प्रेजेंटर रवी शास्त्री यांच्यासोबत काही बोलला नाही. खेळाडूला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेजेंटर त्याला विचारतो, त्याच्याशी बोलतो. पण विराट कोहलीला बोलायच नव्हतं. त्याने रवी शास्त्रीला हात दाखवला व तो खाली निघून गेला. विराट कोहली पराभवानंतर भावूक झाला होता. तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
टोपीखाली आपला चेहरा झाकून पॅव्हेलियनमध्ये परतला
टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनल गमावल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू आले. भारतीय कॅप्टन खूप निराश होता. मॅच संपताच तो ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. विराट कोहली सुद्धा टोपीखाली आपला चेहरा झाकून पॅव्हेलियनमध्ये परतला. सिराजच्या डोळ्यातही अश्रू होते.
The moment Virat Kohli recive Player of the Tournament award. 🐐
– He was heart broken when he received, even he denied for interview and Ravi Shastri said it’s ok, He was completely heartbroken..!! pic.twitter.com/VXpoD9QPxO
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 20, 2023
ही खंत त्याच्या मनात राहिलं
टीम इंडियाने भले वर्ल्ड कप जिंकला नाही. पण विराट संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चॅम्पियनसारखा खेळला. 11 सामन्यात 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. त्याने 3 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा कुठल्या फलंदाजाने 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. याच वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने 50 शतकांचा कारनामा केला. एकूण मिळून विराट कोहलीसाठी ही टुर्नामेंट खास होती. पण शेवटी तो आपल्या टीमला चॅम्पियन बनवू शकला नाही, ही खंत त्याच्या मनात राहिलं.