IND vs SA, 1st ODI: कॅप्टन नाय म्हणून काय झालं? विराट कोहली थेट टेंबा बावुमालाच भिडला, पाहा VIDEO

| Updated on: Jan 19, 2022 | 8:04 PM

कर्णधारपद गेल्यानंतर विराट कोहलीमध्ये तोच जोश, उत्साह टिकून असेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्याची आक्रमकता कमी झाली असेल का? असे प्रश्न काही जणांच्या मनात होते.

IND vs SA, 1st ODI: कॅप्टन नाय म्हणून काय झालं? विराट कोहली थेट टेंबा बावुमालाच भिडला, पाहा VIDEO
Follow us on

पार्ल: बोलँड पार्क मैदानावर विराट कोहली (Virat Kohli) आज जेव्हा सामना खेळण्यासाठी उतरला, त्यावेळी त्याच्यासाठी एक वेगळी भावना होती. कारण चार वर्षानंतर विराट एक सामान्य खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. भारताचा यशस्वी कर्णधार राहिलेला कोहली आज केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली मैदानात खेळण्यासाठी उतरला. कर्णधारपद गेल्यानंतर विराट कोहलीमध्ये तोच जोश, उत्साह टिकून असेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्याची आक्रमकता कमी झाली असेल का? असे प्रश्न काही जणांच्या मनात होते. विराटने त्या सर्व प्रश्नांची आज मैदानावर उतरं दिली. कर्णधार म्हणून खेळताना विराटमध्ये जो जोश असायचा, तसाच उत्साह आजही दिसला. त्याचा आक्रमकपणा अजिबात कमी झाला नव्हता. विराटचा टेंबा बावुमा (Temba Bavuma) बरोबर मैदानावर वादही झाला. जो प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आहे.

मैदानावर असं काय घडलं? की दोघांनी मैदानावर परस्परांना ठसन दिली

टेंबा बावुमा आणि विराट कोहलीमध्ये मैदानावर असं काय घडलं? की दोघांनी मैदानावर परस्परांना ठसन दिली. एका थ्रो वरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. 36 व षटक सुरु होतं. युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्याच्या चौथ्या चेंडूवर बावुमाने कव्हर्समध्ये फटका खेळला. तिथे विराट कोहली उभा होता. विराट कोहलीने लगेच चेंडू उचलला व विकेटकिपर ऋषभ पंतच्या दिशेने थ्रो केला.

हा थ्रो बावुमाच्या बाजूने गेला.थोडक्यात तो बचावला. त्यानंतर बावुमा विराटला काहीतरी बोलला. त्यानंतर शांत बसेल तो,विराट कसला? त्याने त्याच आक्रमक शैलीत बावुमाला उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बावुमाने झळकावलं शतक
या वादानंतर बावुमाने आपले चित्त ढळू दिले नाही. तो क्रीजवरच टिकून राहिला व वनडे करीयरचा दुसरं शतक झळकावलं. बावुमाने 143 चेंडूत 110 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी डुसेसोबत त्याने 204 धावांची भागीदारी केली.

virat kohli heated argument with temba bavuma india vs south africa 1st odi paarl