वर्षभरात विराट कोहलीने कमवले 847 कोटी रुपये, त्यानंतरही बनला नाही नंबर वन
virat kohli income: विराटकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. तो भारतीय क्रिकेट मंडळाच्या केंद्रीय करारात सर्वोच्च श्रेणीत आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. त्यानंतर वर्षभर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळण्यासाठी वेगवेगळी फी देखील मिळते.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जगभरातील श्रीमंत खेळाडूमध्ये गणला जातो. फक्त क्रिकेटचा विचार केल्यास सध्या त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती कोणत्याही क्रिकेट खेळाडूकडे नाही. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे मैदानाबाहेर कमाईच्या बाबतीत विराट नंबर वन आहे. मागील वर्षभरात जगभरातील क्रिकेटरांमध्ये सर्वाधिक कमाई विराट कोहलीने केली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विराट कोहलीची मागील एका वर्षाची कमाई 847 कोटी रुपये आहे. त्यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे. या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत पोर्तुगाल सुपरस्टार फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. त्याची वर्षभराची कामाई 2081 कोटी आहे.
टॉप-10 मध्ये एकमेव क्रिकेटर
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्यात विराट कोहलीची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे विराट कोहलीचे उत्पन्न वाढले आहे. स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार, गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली नवव्या क्रमांकावर आहे. 1 सप्टेंबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024 दरम्यानचे उत्पन्न त्यात आहे. या यादीत जास्त फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू आहे.
जाहिरातीमधून मोठे उत्पन्न
विराटकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. तो भारतीय क्रिकेट मंडळाच्या केंद्रीय करारात सर्वोच्च श्रेणीत आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. त्यानंतर वर्षभर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळण्यासाठी वेगवेगळी फी देखील मिळते. त्यातूनही १ ते १.५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून प्रत्येक मोसमात विराट कोहलीला १५ कोटी रुपये मिळतात. क्रिकेटनंतर मैदानाबाहेर जाहिरातीमधून विराटचे उत्पन्न चांगले आहे. त्याला MRF, Puma, Audi, HSBC, American Tourister, Philips आणि डझनभर देशी-विदेशी कंपन्यांच्या जाहिराती तो करतो. तसेच विराट स्वतः डिजीट इंडिया, वन ॲट कम्युन, राँग यासह अनेक कंपन्यांचा मालक किंवा शेअरहोल्डर आहे. मागील वर्षी त्याने 66 कोटी रुपये आयकर भरला होता.
Highest paid athletes from 1st Sep 2023 to 1st Sep 2024 (Statista):
Ronaldo – 2,081cr.Jon Rahm – 1,712cr.Messi – 1,074cr.LeBron James – 990cr.Mbappe – 881cr.Giannis Anterokounmpo – 873cr.Neymar – 864cr.Karim Benzema – 864cr.Virat Kohli – 847cr.Stephen Curry – 831cr.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 6, 2024
सर्वाधिक कमाई करणारे 10 खेळाडू
- क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल) – 2081 कोटी
- जॉन रॉड्रिग्ज (गोल्फ) – १७१२ कोटी
- लिओनेल मेस्सी (फुटबॉल)- 1074 कोटी
- लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) – 990 कोटी
- कायलियन एमबाप्पे (फुटबॉल) – ८८१ कोटी
- जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल) – 873 कोटी
- नेमार जूनियर (फुटबॉल)- 864 कोटी
- करीम बेंझेमा (फुटबॉल) – 864 कोटी
- विराट कोहली (क्रिकेट) – ८४७ कोटी
- स्टीफन करी (बास्केटबॉल) – 831 कोटी