Virat kohli on odi series: ‘खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा’, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

योग्य दिशेला संघाला घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे. रोहित शर्मा एक सक्षम कर्णधार आहे. मनुष्य व्यवस्थापनात पारंगत असलेल्या राहुल द्रविड यांना वनडे आणि टी-20 मध्ये माझे १०० टक्के योगदान मिळेल.

Virat kohli on odi series: 'खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा', पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Virat Kohli - Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 2:32 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South africa tour) रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. भारतीय संघ परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेण्याची परंपरा आहे. अन्य पत्रकार परिषदांपेक्षा ही प्रेस कॉन्फरन्स वेगळी होती. कारण याला रोहित-विराटच्या (Virat kohli) कथित वादाची किनार होती. रोहित दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळणार नाहीय, तर विराटने मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी वनडे सीरीजमधुन ब्रेक मागितल्याची चर्चा सुरु होती. रोहितला वनडे आणि टी 20 चे कॅप्टन बनवल्यामुळे विराट नाराज असल्याचं बोललं जात होतं. हे सर्व कथित वाद आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर विराटने आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. अनेक वादग्रस्त प्रश्नांना उत्तर दिली.

विराटच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – संघात निवडीसाठी मी नेहमीच उपलब्ध होतो आणि आहे. ब्रेक संदर्भात बीसीसीआय बरोबर माझे काहीही बोलणे झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी मी उपलब्ध आहे.

– मला टी 20 चे कर्णधारपद सोडायचं आहे, हे मी बीसीसीआयला सांगितलं, तेव्हा त्यांनी ते मान्य केलं. वनडे आणि कसोटीमध्ये नेतृत्व करण्याची इच्छा आहे, हे मी तेव्हा सांगितलं होतं.

– योग्य दिशेला संघाला घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे. रोहित शर्मा एक सक्षम कर्णधार आहे. मनुष्य व्यवस्थापनात पारंगत असलेल्या राहुल द्रविड यांना वनडे आणि टी-20 मध्ये माझे १०० टक्के योगदान मिळेल.

– रोहित आणि माझ्यामध्ये काही समस्या नाही. मागच्या दोन वर्षांपासून मी हेच सांगत आहे, आता मी थकलो आहे, असे विराट म्हणाला

– “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल” ‘रोहितचा अनुभव आणि कौशल्याची उणीव भासेल’ असे विराट म्हणाला.

– “मी निवडीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही असे प्रश्न मला विचारु नयेत. उलट हे प्रश्न तुम्ही जे, मी उपलब्ध नाही, असं लिहितात त्यांना आणि त्यांच्या सूत्रांना विचारा. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध आहे” असे कोहलीने पत्रकारांना सांगितले.

– मी वनडेसाठी उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी नेहमीच गंभीर होतो. जे खोट्या बातम्या लिहितात त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा” असे विराट म्हणाला.

संबंधित बातम्या: ‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक! ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला…

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...