टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

विराट कोहली आता भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याच्या जागी ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. कोहलीने ICC T20 विश्वचषक-2021 पूर्वीच सांगितले होते की, तो खेळाच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी घेणार नाही.

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित
Virat Kohli
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 10:57 AM

मुंबई : विराट कोहली आता भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याच्या जागी ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. कोहलीने ICC T20 विश्वचषक-2021 पूर्वीच सांगितले होते की, तो खेळाच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी घेणार नाही. मात्र, विराट कोहलीला कर्णधार म्हणून निरोप देता आला नाही. या संघाला टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही. विराट कोहलीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अनेकांना आवडला नाही आणि त्यामुळेच अनेकजण त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमदने तर कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावरून टीम इंडियामध्ये काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले आहे. मुश्ताकने कोहलीच्या निवृत्तीबद्दलही वक्तव्य केले आहे. (Virat Kohli quitting T20 captaincy shows all is not well in Indian dressing room, he could soon take retirement : Mushtaq Ahmed)

मुश्ताक पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजवर म्हणाला की, “जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की, त्याला कर्णधारपद सोडायचे आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक चाललेलं नाही. मला सध्या टीम इंडियामध्ये दोन गट दिसत आहेत. एक गट मुंबईचा आणि एक गट दिल्लीचा आहे. मला वाटतं कोहली लवकरच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहील.

आयपीएलमुळे भारताचा खेळ बिघडला

वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की, बायो बबलमध्ये बराच काळ राहिल्याने टीमच्या खेळाडूंवर आणि त्यांच्या खेळावर परिणाम झाला, ज्याचा थेट परिणाम आपण वर्ल्ड कपमध्ये पाहिला. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू IPL-2021 मध्ये खेळत होते. याआधी भारतीय संघ जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर होता आणि सतत बायो बबलमध्ये राहत आहे. मुश्ताक म्हणाला, “मला वाटते की आयपीएलमुळे भारतीय संघ फ्लॉप ठरला. मला वाटते की, त्यांचे खेळाडू विश्वचषकाच्या खूप आधीपासून बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते थकले होते.”

इंझमामचा पाठिंबा

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही मान्य केले आहे की, बायो बबलमध्ये दीर्घकाळ राहण्याचा टीम इंडियाच्या खेळाडूंवर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, “मी रवी शास्त्री यांच्याशी सहमत आहे की, भारतीय खेळाडू विश्वचषकासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. ते लोक आयपीएलमुळे थकले होते आणि ते सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसून आले.

इतर बातम्या

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Virat Kohli quitting T20 captaincy shows all is not well in Indian dressing room, he could soon take retirement : Mushtaq Ahmed)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.