IND Vs PAK: विराट कोहलीला पाकिस्तानचा संघ इतका का घाबरतो? जाणून घ्या 4 कारणं

आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला भिडणार आहेत. या महामुकाबल्याकडे कोट्यवधी फॅन्सचे लक्ष लागले आहे. या सामन्यात सगळ्यांची नजर विराट कोहलीवर (Virat Kohli) सुद्धा असणार आहे.

IND Vs PAK: विराट कोहलीला पाकिस्तानचा संघ इतका का घाबरतो? जाणून घ्या 4 कारणं
Virat kohli Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 1:20 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला भिडणार आहेत. या महामुकाबल्याकडे कोट्यवधी फॅन्सचे लक्ष लागले आहे. या सामन्यात सगळ्यांची नजर विराट कोहलीवर (Virat Kohli) सुद्धा असणार आहे. कारण तो आशिया कप स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. विराट कोहलीने नेहमीच पाकिस्तानी (Pakistan) गोलंदाजांना रडवलं आहे. विराट कोहलीने बहुतांशवेळा पाकिस्तान विरुद्ध दमदार फलंदाजी केली आहे. त्याचं चमकदार प्रदर्शन याचा पुरावा आहे. यावेळी आशिया कप मध्ये विराट कोहली पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतो. त्यामागची पाच कारणं समजून घ्या.

  1. विराट कोहलीचा पाकिस्तान विरुद्ध टी 20 रेकॉर्ड कमालीचा आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध 7 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 77.75 आहे. टी 20 क्रिकेट मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
  2. आशिया कप बद्दल बोलायच झाल्यास, विराट कोहलीची पाकिस्तान विरुद्ध सरासरी 68 पेक्षा जास्त आहे. विराटने 3 सामन्यात 206 धावा केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध त्याने एक शतक झळकावलं आहे. आशिया कप मध्येच विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध 183 धावांची इनिंग खेळला होता. ते त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
  3. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध टी 20 फॉर्मेट मध्ये एकूण 2 शतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर दोन अर्धशतकही ठोकली आहेत. लिमिटेड ओव्हर फॉर्मेट मध्ये प्रत्येक स्पर्धेत कोहलीने पाकिस्तान विरुद्ध कमालीच प्रदर्शन केलं आहे.
  4. दुबई मध्ये ज्या मैदानात भारत-पाकिस्तान भिडणार आहेत, तिथेही विराट कोहलीने शानदार अर्धशतक फटकावलं आहे. 2021 टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध हे अर्धशतक झळकावलं होतं. भारताने त्या सामन्यात रोहित, केएल राहुल आणि सूर्यकुमारचे विकेट लवकर गमावले होते. पण विराट कोहलीने डाव संभाळला व 57 धावांची इनिंग खेळला. टीम इंडियाने हा सामना गमावला होता.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.