Virat Kohli: मोठी बातमी, कर्णधार म्हणून BCCI ने 100 व्या कसोटीसाठी दिलेली ऑफर विराटने धुडकावली

विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी अचानक कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाचा धक्का दिला. विराटने टि्वटरवर स्टेटमेंट पोस्ट करुन कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर करताना BCCI चे आभार मानले.

Virat Kohli: मोठी बातमी, कर्णधार म्हणून BCCI ने 100 व्या कसोटीसाठी दिलेली ऑफर विराटने धुडकावली
Virat Kohli
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 4:52 PM

बंगळुरु: विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी अचानक कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाचा धक्का दिला. विराटने टि्वटरवर स्टेटमेंट पोस्ट करुन कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर करताना BCCI चे आभार मानले. दरम्यान कर्णधार म्हणून निरोपाचा कसोटी सामना खेळण्यासाठी BCCI ने विराटला ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार म्हणून 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी विराटला प्रस्ताव देण्यात आला होता. शुक्रवारी विराट बरोबर फोनवरुन बोलणं झालं, त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विराटला कॅप्टन म्हणून बंगळुरुमध्ये खेळण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

बंगळुरु त्याचं दुसर घर

विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार होता. त्यामुळे एकाअर्थाने बंगळुरु त्याचं दुसर घर आहे. त्यामुळे त्याला बंगळुरुत 100 वा कसोटी सामना खेळण्याची ऑफर देण्यात आली होती. पण विराटने या प्रस्तावामध्ये रस दाखवला नाही व नकार दिला. क्रिकट्रॅकर वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे. ‘एक मॅचने फरक पडत नाही, मी असा नाहीय’ असे विराटने समोरच्या व्यक्तीला म्हटलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी हरल्यानंतर विराटने दुसऱ्याचदिवशी कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

विराटच्या या राजीनाम्यान भारतीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विराटने टी-20 चे कर्णधारपद स्वत:हून सोडले होते. पण त्याला वनडेची कॅप्टनशिप सोडायची नव्हती. पण त्याला वनडे कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. त्यावरुन बरेच वाद-विवाद झाले.

ज्या जबाबदाऱ्या, दबाव येत होता

विराटला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ज्या जबाबदाऱ्या, दबाव येत होता. त्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्याने राजीनामा दिला असं बोलल जातयं. विराटच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. राजीनाम्याचा निर्णय घेण्याआधी विराटने हेड कोच राहुल द्रविड, ड्रेसिंग रुमममध्ये संघातील सहकारी आणि त्यानंतर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

संबंधित बातम्या: सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ Pat Cumminss: कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या मुस्लिम धर्माचा मान ठेवला, मैदानावरच्या कृतीने मन जिंकलं, पाहा VIDEO IPL 2022 ‘हा’ मोठा खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही, पराभवामुळे भंग पावलं स्वप्न

(Virat Kohli rejected the offer of playing his 100th Test as Indias skipper in Bengaluru)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.