‘तुमची टीम जिंकली नाही, तर तुम्ही किती…’, मराठमोळ्या अजित आगरकरचं विराट कोहलीबद्दल महत्त्वाचं विधान
नोव्हेंबर 2019 पासून विराट कोहलीने एकही शतक झळकावलेलं नाही. कसोटीमधील त्याच्या खराब कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. मागच्यावर्षी 28.21 च्या सरासरीने 19 डावांमध्ये त्याने फक्त 536 धावा केल्या.
मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. “विराट कोहली तिन्ही फॉर्मेटमधील संघाचा अविभाज्य भाग आहे. तो फॉर्ममध्ये परतला, तर संघ रचनेमध्ये कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) मदतच होईल” असे आगरकरने म्हटलं आहे. कोहलीचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. नोव्हेंबर 2019 पासून विराट कोहलीने एकही शतक झळकावलेलं नाही. कसोटीमधील त्याच्या खराब कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. मागच्यावर्षी 28.21 च्या सरासरीने 19 डावांमध्ये त्याने फक्त 536 धावा केल्या. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन अर्धशतक झळकावून विराटने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. कोहली चांगली सुरुवात करतोय पण ती सुरुवात, त्याला मोठ्या धावसंख्येमध्ये बदलणं जमत नाहीय.
दिवसाच्या शेवटी एकच गोष्टी महत्त्वाची विराटने सर्व फॉर्मेटमध्ये कर्णधारपद सोडलं आहे. आपल्या बॅटने संघाला योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विराट लवकर फॉर्ममध्ये आला, तर संघासाठी ते चांगलं असेल, असं आगरकर म्हणाला. “दिवसाच्या शेवटी एकच गोष्टी महत्त्वाची ठरते. तुमचा संघ यशस्वी असेल, तर तुम्ही यशस्वी आहात. तुमची टीम जिंकली नाही, तर तुम्ही किती मोठे खेळाडू आहात, त्याने काही फरक पडत नाही. संघात खेळण्याचा तुम्हाला आनंद मिळणार नाही” असे आगरकरने स्टार स्पोर्ट्सवर ‘गेम प्लान’ कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
विराट जितक्या लवकर फॉर्ममध्ये परतेल, तितकं…. “विराट कोहलीकडे जी क्षमता आहे, त्यामुळे तो संघातील महत्त्वाचा घटक आहे. पण सध्याच्या घडीला तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीय. विराट जितक्या लवकर फॉर्ममध्ये परतेल, तितकं रोहित शर्माचं काम सोप होईल” असं अजित आगरकर म्हणाले. “विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. पण तो काय क्षमतेचा खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याला लवकर सूर गवसेल अशी आपण अपेक्षा करु” असे आगरकर म्हणाला.
Virat Kohli returning to form will make things much easier for captain Rohit Sharma Ajit Agarkar