पुढच्या वर्षी IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये RCB ची पुनर्बांधणी, विराट म्हणतो ‘मजबूत संघ तयार करण्याची संधी’

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. इतकी वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता अखेर तो दिवस आला, ज्या दिवशी कर्णधारपदाला अलविदा म्हणायचंय…

पुढच्या वर्षी IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये RCB ची पुनर्बांधणी, विराट म्हणतो 'मजबूत संघ तयार करण्याची संधी'
Virat Kohli
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:18 AM

दुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधार म्हणून शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले आहे. कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. (Virat Kohli shares his thoughts over his RCB Captaincy experience, made 4 big statements)

सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. इतकी वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता अखेर तो दिवस आला, ज्या दिवशी कर्णधारपदाला अलविदा म्हणायचंय… हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या पाठिंब्याबद्दल त्याने आभार व्यक्त करताना यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्याव तीने 120 टक्के देईन, अशी ग्वाहीही दिली.

कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना

विराट कोहली 9 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेन तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितलं.

RCB चा कर्णधार म्हणून विराटची 4 मोठी विधानं

विराट कोहली म्हणाला की त्याने नेहमीच त्याच्या फ्रँचायझीसाठी सर्वोत्तम दिले. त्याने फ्रँचायझीला 120 टक्के दिलं आहे. अर्थात तो आता कर्णधार राहिला नाही, पण एक खेळाडू म्हणून तो पुढेही याच संघासोबत राहील.

विराटने आयपीएलच्या आगामी मेगा ऑक्शनला संघांची पुनर्बांधणी प्रक्रिया म्हटले आहे. तो म्हणाला की, फ्रँचायझीला पुढील 3 वर्षे पुन्हा मजबूत आणि संघटित संघ तयार करण्याची संधी या लिलावाद्वारे मिळणार आहे.

विराट कोहली म्हणाला की, तो या फ्रँचायझीसाठीच खेळत राहील त्याने केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर तसेच आयपीएलच्या स्टार स्पोर्ट्स प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला. तो म्हणाला की, माझ्यासाठी फ्रँचायझीचा विश्वास आणि वचन सर्वांत वर आहे.

त्याच्या कर्णधारपदाबद्दल विराट कोहली म्हणाला की मी नेहमीच असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात तरुण खेळाडू येऊन मुक्तपणे खेळू शकतील. भारतीय क्रिकेटमध्येही मी हा प्रयत्न करतो.

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट नऊ वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

इतर बातम्या

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

(Virat Kohli shares his thoughts over his RCB Captaincy experience, made 4 big statements)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.