WTC Final ची उत्सुकता शिगेला, विराटसेनेचा पहिला फोटो समोर, टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) सामन्याला सुरुवात होण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. या जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असणारे भारत (India) आणि न्यूझीलंड(NewZealand) हे संघ आमने-सामने असणार आहेत.

WTC Final ची उत्सुकता शिगेला, विराटसेनेचा पहिला फोटो समोर, टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज
Virat Shared Team India Photo
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 4:38 PM

साऊदम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) याच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) सामन्याला काही तासंच शिल्लक आहेत. कसोटी क्रिकेटमधील सर्वात मानाच्या सामन्याला उद्या दुपारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगतात या सामन्याची मोठी उत्सुकता असून मागील बरेच दिवस सर्व खेळाडू संघ प्रशासन आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (ICC) सामन्यासह खेळाडूंबाबतचे विविध अपडेट्स देत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) देखील अंतिम 15 खेळाडू असलेल्या संघासह सर्व स्टाफ असणारा फोटो ट्विट केला आहे. तर आयसीसीने देखील सामन्यात वापरण्यात येणाऱ्या चेंडूची पहिली झलक सर्वांना दाखविली आहे. (Virat Kohli Shares Team India Photo on Twitter and ICC Shares WTC Finals Cricket Ball Photo )

आयसीसीने दाखवली चेंडूची पहिली झलक

WTC Final चा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने सामन्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टीही तितक्याच अव्वल दर्जाच्या आहेत. आयसीसी क्रमवारीत अव्वल असणाऱ्या भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZeland) यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार असून यावेळी ड्यूक्सचा प्रसिद्ध चेंडू वापरण्यात येणार आहे. या चमकत्या चेंडूची पहिली झलक आयसीसीने आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेट रसिक फोटोला लाईक आणि त्यावर कमेंट करत आहे.

टीम इंडियाचे 15 शिलेदार

या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात 15 महत्त्वाच्या खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. यात 5 वेगवान गोलंदाजासह 2 फिरकीपटूंचाही समावेश आहे. भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(Virat Kohli Shares Team India Photo on Twitter and ICC Shares WTC Finals Cricket Ball Photo )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.