विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया

virat kohli and anushka sharma: भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली आहे. भारतीय संघाला परत आणण्यासाठी चार्टड प्लेन बीसीसीआय पाठवणार आहे. आता भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया
virat kohali
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:32 AM

भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे विजयी भारतीय संघाचे देशात स्वागत करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे. परंतु अंतिम सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये धोकादायक चक्रीवादळ आले. यामुळे वेस्ट इंडिजला जाणारी आणि येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. विराट कोहली याने विश्वविजेतपद पटकवल्यानंतर मैदानातूनच कुटुंबाशी संवाद साधला होता. त्याची मुलगी आणि पत्नीशी तो बोलत असतानाचे दृश्य त्यावेळी सर्वांनी पाहिली. आता वेस्ट इंडिजमधील चक्रीवादळाची भीषणता विराटने अनुष्का शर्माला दाखवली आहे. व्हिडिओ कॉल करुन वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेले वेगाने वाहणारे वारे दाखवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ अजूनही बारबाडोसमध्येच अडकला आहे.

काय आहे व्हिडिओत

विराट कोहली आणि भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्ये अडकला आहे. चक्रीवादळामुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे खेळाडू गप्पांमध्ये आणि कुटुंबाशी संवाद साधण्यात वेळ घालवत आहेत. विराट कोहलीने अनिष्काला व्हिडिओ कॉल लावला. त्या माध्यमातून चक्रीवादळाची भीषणता तिला दाखवली. हॉटेलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन किती वेगाने वारे वाहत आहे, ते विराटने दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर युजरच्या अनेक प्रतिक्रिया पडत आहेत.

हे सुद्धा वाचा

चार दिवसांपासून भारतीय संघ अडकला

भारतीय संघाने 29 जून रोजी बारबाडोसमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. रविवारी सामन्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला होता. यामुळे टीम इंडियाचा परतण्याचा प्लॅन 30 जून रोजी रात्री ठेवण्यात आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये बेरील हे चक्रीवादळ सुरु झाले. त्यामुळे भारतीय संघ आणि सहयोगी कर्मचारी वेस्ट इंडिजमध्येच अडकले आहेत.

टीम इंडिया कधी परतणार

भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली आहे. भारतीय संघाला परत आणण्यासाठी चार्टड प्लेन बीसीसीआय पाठवणार आहे. आता भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.

Non Stop LIVE Update
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.