विराट कोहली क्रीजवर उतरतो, तेव्हा कुठला ना कुठला विक्रम मोडला जातो. आज पार्लच्या बोलँड पार्क मैदानावरही असच झालं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नऊ धावा बनवताच विराटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.
विराट कोहली परदेशात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सचिनने परदेशातील खेळपट्ट्यांवर खेळताना 5065 धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड कोहलीने मोडला.
महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने 42 डाव आधीच हा विक्रम मोडला. विराट कोहली परदेशात 104 वनडे सामने खेळला आहे. त्यांची सरासरी 60 आहे. विराटने परदेशातल्या खेळपट्ट्यांवर 20 शतक झळकावली आहेत.
सचिन तेंडुलकरने परदेशात 146 वनडे मॅचेसमध्ये 37.34 च्या सरासरीने 5065 धावा केल्या होत्या. यात 12 शतकांचा समावेश आहे.
विराटने बोलँड पार्कच्या मैदानावर 27 धावा बनवल्यानंतर तो राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या पुढे निघून गेला. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्यामध्ये आता दुसऱ्या स्थानावर आहे. राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मध्ये 1309 आणि सौरव गांगुलीने 1313 धावा केल्या आहेत.