शतक लय लांबची गोष्ट, अवघ्या 7 धावांमुळे कोहलीने ‘विराट’रुप गमावलं, श्रीलंकेचा 5 वर्ष जुन्या जखमेवर वार

बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान हे विराटचं दुसरं होम ग्राऊंड आहे. या दुसऱ्या होम ग्राउंडवर खेळूनही विराट कोहलीला कोणताही फायदा झालेला नाही. श्रीलंकेविरुद्ध डे-नाईट कसोटीच्या दोन दिवसांत विराटला दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा त्याच्या आवडत्या मैदानाची खेळपट्टी त्याच्यासोबत अक्षरशः 'खेळली'.

शतक लय लांबची गोष्ट, अवघ्या 7 धावांमुळे कोहलीने 'विराट'रुप गमावलं, श्रीलंकेचा 5 वर्ष जुन्या जखमेवर वार
Virat Kohli Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 6:53 AM

मुंबई : “न ख़ुदा ही मिला न विसाल-ए-सनम न इधर के हुए न उधर के हुए”… हा शेर भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) सर्वात मोठा स्टार असलेल्या विराट कोहलीसाठी (Virat Kohli) परफेक्ट वाटतोय. विराट कोहलीने गेल्या काही वर्षांत त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ पाहिला आहे, जिथे त्याने प्रत्येक फॉरमॅट आणि प्रत्येक संघाचं कर्णधारपद गमावलं. गेल्या अडीच वर्षात तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावू शकलेला नाही. त्याच्या शतकाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही आणि आता असं काहीतरी घडलंय ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. 5 वर्षांनंतर श्रीलंकेने विराट कोहलीच्या सर्वोत्तम आकड्यांना सुरुंग लावला आहे. अवघ्या 7 धावांनी विराट कोहलीची कसोटी सरासरी (Virat Kohli Test Average) खालावली आहे.

बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान हे विराटचं दुसरं होम ग्राऊंड आहे. या दुसऱ्या होम ग्राउंडवर खेळूनही विराट कोहलीला कोणताही फायदा झालेला नाही. श्रीलंकेविरुद्ध डे-नाईट कसोटीच्या दोन दिवसांत विराटला दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा त्याच्या आवडत्या मैदानाची खेळपट्टी त्याच्यासोबत अक्षरशः ‘खेळली’. ज्या मैदानावर कोहलीचा शतकाचा दुष्काळ संपेल अशी जगभरातील त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. तिथे शतक झळकावणं तर दूरच विराटची कसोटी आकडेवारीदेखील खराब झाली आहे.

5 वर्षांनंतर सरासरी 50 च्या खाली

शतक-अर्धशतक ही तर खूप दूरची गोष्ट होती, पण विराटला पिंक बॉल टेस्टच्या दोन्ही डावात मिळून 50 धावादेखील करता आल्या नाहीत आणि त्याचा मोठा फटका कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील उत्कृष्ट आकडेवारीला बसला आहे. बंगळुरू कसोटीत कोहलीसाठी 43 धावा खूप महत्त्वाच्या होत्या, पण तो दोन्ही डावात मिळून केवळ 36 धावा (23 आणि 13) करू शकला आणि त्यामुळे त्याची कसोटी फलंदाजीची सरासरी 50 च्या खाली आली. एकेकाळी 55 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करुन जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केलेल्या कोहलीची सरासरी गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच 50 च्या खाली घसरली आहे.

श्रीलंकेचा 5 वर्ष जुन्या जखमेवर वार

हा देखील योगायोग आहे की, यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना कोहलीची सरासरी 50 वरून 49.55 पर्यंत घसरली होती. आता त्याची सरासरी 49.75 इतकी खाली आहे आणि यावेळीदेखील भारतासमोर श्रीलंकेचा संघ उभा आहे.

इतर बातम्या

VIDEO : रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, पण का?

Women’s World Cup : महिला विश्वचषकात विक्रमांवर विक्रम, मिताली राजचा नवा विक्रम, ती ठरली पहिली खेळाडू

IND vs SL: स्टेडियममध्ये रोहितच्या सिक्सने चाहत्याचं नाक फुटलं, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात न्याव लागलं

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.