IND vs SA: विराट बाद झाला म्हणून आफ्रिकेच्या खेळाडुंनी मैदानात जल्लोष सुरु केला आणि तितक्यात…

विराट कोहलीचा (Virat Kohli) विकेट हा कुठल्याही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे विराटला बाद करणं, हे कुठल्याही संघाचं प्रथम लक्ष्य असतं.

IND vs SA: विराट बाद झाला म्हणून आफ्रिकेच्या खेळाडुंनी मैदानात जल्लोष सुरु केला आणि तितक्यात...
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 9:33 PM

केपटाऊन: विराट कोहलीचा (Virat Kohli) विकेट हा कुठल्याही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे विराटला बाद करणं, हे कुठल्याही संघाचं प्रथम लक्ष्य असतं. दक्षिण आफ्रिकेचा संघही (South Africa Team) याला अपवाद नाहीय. आज भारताच्या डावात 52 व्या षटकात असाच विचित्र प्रकार पाहायला मिळाला. डुएन ओलिवियर गोलंदाजी करत होता. समोर स्ट्राइकवर विराट कोहली होता.

ओलिवियरने विराटच्या पायाच्या दिशेने चेंडू टाकला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मोठ अपील केलं. पंचांवर त्याचा काही फरक पडला नाही. पण पुढच्याच क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मैदानात जल्लोष सुरु केला. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. विराट कोहली विरुद्ध कॅचचं अपील केलं होतं. आफ्रिकेच्या खेळाडूंनी डीआरएस घेतला. स्निको मीटर पाहून त्यांनी जल्लोष सुरु केला होता. पण तिसऱ्या पंचांनी योग्य निर्णय घेत विराटला नाबाद ठरवलं.

52 व्या षटकाच डुएन ओलिवियरने टाकलेला चौथा चेंडू विराटच्या पायामागून दक्षिण आफ्रिकन विकेटकीपरच्या हातात गेला. आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरने डीआरएसची मदत घेतली. चेंडू विराट कोहलीच्या बॅटच्या बाजूने गेला. त्यावेळी स्निको मीटरवर थोडी हालचाल दिसली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना विराट बाद झालाय असं वाटलं व त्यांनी जल्लोष सुरु केला. पण तिसऱ्या पंचांनी ते फुटेज नीट पाहिलं व विराटला नाबाद ठरवलं.

त्यानंतर आफ्रिकन संघ एकदम थंड पडला. त्यांचा उत्साह क्षणात मावळला. रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये गॅप असल्याचं स्पष्ट दिसतं होतं. त्यामुळेच विराटला नाबाद ठरवलं. जेव्हा हे अपील झालं, तेव्हा विराट 39 रन्सवर खेळत होता. त्यानंतर विराटने मागे वळून बघितलं नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.