Video : ‘त्या’ सवयीमुळे विराट कोहलीला बहिणीने धु धु धुतलं! शेवटी बदलावा लागला स्वभाव
विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने दोन किस्से सांगितले आहेत. एका लग्नात पैसे उडवण्यासाठी काय केलं? आणि दुसरं म्हणजे बहिणीने विचित्र स्वभाव कसा एका दिवसात बदलला? याबाबत सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मुंबई : विराट कोहली हे क्रिकेट विश्वातील मोठं नावं..विराट कोहलीला रनमशिन म्हणून संबोधलं जातं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नुकताच त्याने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीची मैदानातील आक्रमक शैली अनेकांनी अनुभवली आहे. अनेकदा त्याचं वादात देखील रुपांतर झालं आहे. विकेट घेतल्यानंतर विराट कोहलीचं सेलिब्रेशन तर बघण्यासारखं असतं. पण क्रिकेटच्या मैदानातील आक्रमक स्वभाव मैदानाबाहेर मात्र शांत असतो. नेमकं असं का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर त्याचं उत्तर खुद्द विराट कोहलीने एका मुलाखतीत दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली बहिणीने कसं मारलं होतं? हा किस्सा सांगत आहे. त्याचं कारणंही तसंच होतं. कारण विराट कोहली आदरार्थी बोलण्याची सवयच नव्हती. तो समोरच्याला कायम ‘तू’ असं एकेरी बोलायचा. एक दिवस बहिणीने इंगा दाखवत त्याला सरळ केलं.
“लोकं लग्नात पैसे उडवून नाचताना मी पाहिलं होतं. त्यामुळे पैसे उडवून नाचण्याचा एक वेगळाच आनंद होतो असं मला वाटलं. एक दिवस मला घरच्यांनी सामान खरेदीसाठी 50 रुपये दिले. तेव्हा मला नेमकं काय झालं माहिती नाही. खाली उतरताना मी 50 रुपयाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते उडवून त्या खाली नाचलो. मी सामनाच आणलं नाही.”, असं विराट कोहली त्या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
“माझ्या बहिणीने मला खूप मारलं होतं. खूप मारलं. मी ‘तू’असं एकेरी बोलायचो. अशी मला सवय लागली होती. दीदीला काय राग आला माहिती नाही. तिने मला असं मारलं की तोंडातून त निघणंच बंद झालं. आ हा शब्दच निघायचा. आप कैसे हो..वगैरे..”, असा किस्सा विराट कोहलीने सांगितला.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची पडझड झाली. विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. एकदा 4 धावांवर असताना जीवदान मिळालं. पण 38 धावांवर असताना रबाडाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे कसोटीवर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड पहिल्या दिवसापासून दिसत आहे.