IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!
विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 12:49 PM

लंडन : इंग्लंड (England) विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 च्या आघाडीवर असणारा भारतीय संघ आघाडी 2-0 ची करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  त्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज सायंकाळी 5 वाजता काही महत्त्वाचे निर्णय़ घेणार आहे. कोहली आज सायंकाळी 5 वाजता सामन्याआधीची पत्रकार परिषद घेणार असून यावेळी तो काय बोलणार?, काय निर्णय़ घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हेडिंग्ले येथे उद्यापासून (25 ऑगस्ट) सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघ (Team India) काय रणनीती आखणार? कोणत्या खेळाडूंना खेळवले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विराट कोहलीकडे सध्या निर्णय घेण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा गोलंदाजी असून नेमके कोणते गोलंदाज खेळवायचे? हा प्रश्न आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या 4 वेगवान गोलंदाजासह रवींद्र जाडेजा या एका फिरकीपटूला घेऊन विराट मैदानात उतरला होता. आता तिसऱ्या टेस्टमध्ये विराट हीच रणनीती कायम ठेवणार की बदल करणार हे पाहावे लागेल.

अश्विनबाबतचा निर्णय आज सायंकाळी 5 वाजता!

कसोटी क्रिकेटचा विषय येताच भारताचा प्रमुख खेळाडू म्हणून आर अश्विनचे नाव समोर येते. जगातील सध्याचा अव्वल क्रमाकांचा फिरकीपटू आणि एक विश्वासू फलंदाज असणारा आश्विन पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात नव्हता. त्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आश्विनला संघात घेण्याबाबत भाष्य केलं. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत आश्विनला संधी मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेतच मिळेल.

इतर बातम्या

IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

(Virat kohli will decide third match plan today at prematch press conference)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.