IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
Virat Kohli RCB captaincy | नुकतंच भारतीय टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीने आथा आयपीएल संघ आरसीबीचं कर्णधारपदही यंदाच्या आयपीएलनंतर सोडणार असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट फॅन्सना एक मोठा झटका बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी ट्वेण्टी वर्ल्ड कपनंतर टी ट्वेण्टी संघाच्या कर्णधारपदावरुन (Virat Kohli captaincy) पायउतार होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच दिली असताना आता आरसीबीचे (RCB) कर्णधारपदही यंदाच्या आयपीएलनंतर सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
सोमवारी (20 सप्टेंबर) आयपीएलच्या उर्वरीत पर्वातील आरसीबीचा पहिलाच सामना केकेआर संघाविरुद्ध (RCB vs KKR) असणार आहे. विशेष म्हणजे हा कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद पर्व संपल्यानंतर सोडणार असल्याची घोषणा केली आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये विराटने ही माहिती दिली आहे.
Virat Kohli to step down from RCB captaincy after #IPL2021
“This will be my last IPL as captain of RCB. I’ll continue to be an RCB player till I play my last IPL game. I thank all the RCB fans for believing in me and supporting me.”: Virat Kohli#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/QSIdCT8QQM
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 19, 2021
आरसीबी मात्र सोडणार नाही…
विराटने त्याचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली असली तरी यावेळी त्याने ‘मी माझा शेवटचा आयपीएल सामना खेळेपर्यंत आरसीबी संघ सोडणार नाही’ हेही स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्याने ज्याप्रमाणे भारतीय टी20 संघाचं कर्णधारपद स्वत:च्या खेळावर लक्ष देण्यासाठी आणि काही प्रमाणात तणावातून मुक्त होण्यासाठी सोडलं त्याप्रमाणेच हे पदही सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. भविष्यातील खेळाडूंना संधी देण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.
कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. यासोबतच ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचे उर्वरीत सामने
– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
हे ही वाचा
IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण
PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश
(Virat Kohli will step down as RCB captain after IPL 2021 RCB tweeted video)