Virat Kohli ची दहावीची मार्कशीट व्हायरल, मार्क पाहण्यासाठी लोकं तुटून पडले
विराट कोहली याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांना आवडतं. त्याच्या चाहत्यांची संख्या इतकी मोठी आहे की त्याने काहीही शेअर केले की ते लगेच व्हायरल होऊन जातं. आता त्याची दहावीची मार्कशीट व्हायरल झालीये.
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याचा बोलबाला आज जगभरात पाहायला मिळतो. त्याने कमी वेळेतच अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. विराट कोहलीने ( Virat Kohli ) भारतीय संघाचं नेतृत्व करत असताना देखील अनेक महत्त्वाच्या खेळी करत भारतीय संघाला विजयी केले आहे. पण विराट शालेय जीवनात विद्यार्थी असताना कसा होता. त्याला दहावीला किती गुण मिळाले होते. याबाबत सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण त्याची दहावीची मार्कशिट व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा रन-मशीन बनण्यापूर्वी विराटला गणित विषयाची थोडी कमी आवड होती. असं दिसत आहे.
विराट कोहलीने देखील याआधी स्वतः कबूल केले होते की त्याने गणित विषयात उत्तीर्ण गुण मिळविण्यासाठी जितकी मेहनत केली तितकी त्याने क्रिकेटमध्ये कधीही केली नाही.
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल
कोहलीने एक पोस्ट शेअर केली ज्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आणि लोकं त्याची मार्कशीट पाहण्यासाठी तुटून पडले. विराट कोहलीने कू अॅपवर त्याच्या दहावीच्या मार्कशीटचा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शन दिले की, “तुमच्या मार्कशीटवर कमी असलेल्या गोष्टी तुमच्या चारित्र्याला अधिक कशा जोडतात हे मजेदार आहे.” भारताचा माजी कर्णधार कोहलीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरते.
खेळाविषयी जागृकता
विराट कोहलीने क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत हजारो धावा केल्या आहेत. काही लोकांनी दहावीच्या गणिताच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा त्याच्या रनशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोहलीने हे PUMA च्या ‘Let There Be Sport’ मोहिमेचा एक भाग म्हणून शेअर केले आहे जेणेकरून नागरिकांमध्ये शिक्षण आणि पारंपारिक अभ्यासासोबतच खेळांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण व्हावी.
सोशल मीडियावर कोहलीच्या मार्कशीटचा फोटो व्हायरल झाला. आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2023 मध्ये तो आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय.