IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री
आज आयपीएलमध्ये सुपर संडे असून दिवसातील पहिला सामना नुकताच पार पडला. या सामन्य़ात पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यातील सामन्यान आरसीबीने पंजाबर 6 धावांनी विजय मिळवला.
IPL 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज सुपर संडे आहे. आजच्या दिवसात दोन टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना नुकताच शारजाहच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) पंजाब किंग्जवर (Punjab Kings) सहा धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयासोबतच कोहलीचा संघ प्लेऑफमध्येही दाखल झाला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये 12 पैकी 8 सामने जिंकत आरसीबीच्या नावावर 16 गुण आहेत. प्लेऑफमध्ये जाण्याच्या शर्यतीत असणाऱ्या इतर संघाच्या तुलनेत हे सर्वाधिक असून इतर संघाच्या उर्वरीत सामन्यांची संख्या पाहता आरसीबीच सर्वात पुढे राहिल. त्यामुळे त्यांनी प्लेऑफमध्ये आधीच स्थान मिळवलं आहे. चेन्नई, दिल्लीनंतर आऱसीबी प्लेऑफमध्ये जाणारा तिसरा संघ आहे.
2️⃣ points secured. ✅ Qualification for playoffs. ✅
How pumped are you, 12th Man Army? ????#PlayBold #WeAreChallengers #ನಮ್ಮRCB #IPL2021 #RCBvPBKS pic.twitter.com/s610Lr0dEP
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 3, 2021
मॅक्सवेलचं पुन्हा दमदार अर्धशतक
सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने तो निर्णय सार्थ ठरवला. पडीक्कल आणि विराट कोहलीने संघाला 68 धावांची सलामी दिली. विराट कोहली 25 धावांवर बाद झाल्यानंतर पडीक्कलने धावफलक हलता ठेवला. 40 धावा करुन तोदेखील बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (57) अर्धशतकी खेळी करत बँगलोरला दीडशतकी मजल मारुन दिली. एबी डिव्हिलियर्सने 23 धावांचं योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात बरी गोलंदाजी केली. पंजाबकडून मोजेस हेनरिक्सने 4 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 बळी घेतले. तर मोहम्मद शमीने 4 षटकात 39 धावा देत 3 बळी घेतली. शमीने तिन्ही बळी अखेरच्या षटकात मिळवले.
पंजाबची सुरुवात चांगली शेवट खराब
दरम्यान आरसीबीने दिलेले 166 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले. दरम्यान पंजाबची सुरुवात उत्तम झाली. सलामीवीर मयांक (57) आणि राहुल (39) यांच्यानंतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. मार्करने 20, शाहरुखने 16 आणि हेनरिक्स याने 12 धावा केल्या. याशिवाय इतराना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. याउलट दुसऱ्या भागाच्या मंध्यातरानंतर आरसीबने तुफान फलंदाजी केली. यामध्ये अनुभवी युझवेंद्र चहलने महत्त्वाच्या 3 विकेट्स विकेट्स घेतल्या. तर गार्टन आणि अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतला. याशिवाय काही धावचीत विकेट्च्या मदतीने अखेर सामना आरसीबीने जिंकला. अखेरच्या षटकात पंजाबला 19 धावांची गरज होती. पण पंजाबचे फलंदाज 12 धावाच करु शकल्याने अखेर 6 धावांनी आरसीबीचा संघ विजयी झाला आहे.
हे ही वाचा
IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा
(Virat kohlis RCB Won Match Against Punjab kings with 6 Runs)