वीरेंद्र सेहवागने उधळली स्तुतीसुमने, एमएस धोनीचा केला उदो उदो, म्हणाला…
आयपीएलच्या उर्वरीत पर्वाची सुरुवात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सना नमवत केली. यावेळी धोनीच्या रणनीतीने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वाचे सामने नुकतेच सुरु झाले असून पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) या दोन संघादरम्यान खेळविण्यात आली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात एकवेळेस संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारा सामना चेन्नईने ज्याप्रमाणे खेचून आणला ते पाहणं कमालीचं ठरलं. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या बाजूने असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार धोनीची (MS Dhoni) रणनीती पुन्हा उपयोगी पडली. याच रणनीतीचा उदो उदो माजी खेळाडू वीरंद्रे सेहवागने (Virender Sehwag) केला आहे.
नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाला. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. पण मुंबईचा संघात कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थिती असल्याने सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.
काय म्हणाला सेहवाग?
मुंबईते फलंदाज बाद करण्यात चेन्नईच्या गोलंदाजाना स्टम्पमागून धोनीच्या सूचनांची साथ मिळाली. त्याच्या याच रणनीतीची स्तुती करताना सेहवाग म्हणाला, ”धोनीच्या कप्तानी ही स्तुती करण्यायोग्य आहे. तो कायम खेळाडू, समोरचा संघ, मैदानाची स्थिती या साऱ्याचा अंदाज घेऊन रणनीती आखतो. त्याने मुंबई विरुद्धच्या सामन्यातही अशीच उत्तम रणनीती आखली. विशेषता महत्त्वाच्या विकेट घेण्यासाठी त्याने सेट केलेली फिल्डिंग फार महत्त्वाची ठरली. तसंच पोलार्डला बाद करण्यासाठी फिरकीपटू नाही तर हेजलवुड या वेगवान गोलंदाजाला आणनं हाही त्याची निर्णय विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरला”
हे ही वाचा
IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
IPL 2021: राजस्थान रॉयल्समध्ये धाकड खेळाडूंची एन्ट्री, ‘हे’ फलंदाज चौक्यांपेक्षा अधिक छक्के ठोकतात
(Virender Sehwag Praises msd captaincy against mumbai indians)