आशिष नेहराला नीरज चोप्रा म्हणणाऱ्या पाकिस्तानी अँकरची विरेंद्र सेहवागने चांगलीच खेचली
विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या पीचवर पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायचा. आता वीरु रिटायर झाला आहे. क्रिकेटच्या पीचवर शक्य नसलं, तरी सोशल मीडियाच्या पीचवर तो दमदार फलंदाजी करतोय.
मुंबई: विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या पीचवर पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायचा. आता वीरु रिटायर झाला आहे. क्रिकेटच्या पीचवर शक्य नसलं, तरी सोशल मीडियाच्या पीचवर तो दमदार फलंदाजी करतोय. सेहवागने पाकिस्तानी होस्ट जैद हामिदला जबरदस्त ट्रोल केलं. सेहवागने असं करण्यामागे तितकच ठोस कारण आहे. पाकिस्तानी होस्ट आशिष नेहराला जॅवलिन थ्रोअर नीरज चोप्रा समजला. त्याने एक टि्वट केलं. त्यावरुन विरेंद्र सेहवागने जैद हामिदला जबरदस्त ट्रोल केलं.
जैद हामिदने काय ट्विट केलं होतं?
जैद हामिदला ट्रोल करताना विरेंद्र सेहवाने लिहिलं की, “काका आशिष नेहरा आता यूकेच्या पंतप्रधान निवडणुकीची तयारी करत आहे. त्यामुळे थोडा सयंम बाळगा”
अर्शद नदीमच्या कोचने काय म्हटलय?
बर्मिंघम मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये नीरज चोप्रा सहभागी झाला नव्हता. दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत पाकिस्तान जॅवलिन थ्रोअर अर्शद नदीमने जबरदस्त प्रदर्शन केलं. अर्शदने 90.18 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्यानेच गोल्ड मेडल मिळवलं. तेव्हापासूनच पाकिस्तानात अर्शद नदीमची हवा झालीय. “नीरज चोप्राने पाकिस्तानात यावं, इथे दोन्ही एथलीट मध्ये सामना झाला पाहिजे” असं अर्शद नदीमच्या कोचने म्हटलं आहे.
Chicha, Ashish Nehra is right now preparing for UK Prime Minister Elections. So Chill ? pic.twitter.com/yaiUKxlB1Z
— Virender Sehwag (@virendersehwag) August 11, 2022
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये नीरज खेळला नाही
नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं. अलीकडे झालेल्या डायमंड लीग मध्ये त्याने 89.94 मीटर अंतरावर थ्रो केला होता. नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अर्शद नदीम भारतीय उपखंडातील एकमेव एथलीट आहे, जो 90 मीटर पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला.