भारतीय फलंदाजी ‘या’ खेळाडूमुळे बदलली, सर रिचर्डशीही तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक
पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक यांनी भारताच्या माजी सलामीवीराची प्रशंसा केली आहे.
कराची : पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक (Saqlain Mushtaq) हे पाकिस्तानच्या गोलंदाजीतील एक महत्त्वाच हत्यार. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांच्या विकेट घेतल्या होत्या. त्यांनी भारतीय फलंदाजीबद्दल एक मोठ वक्तव्य केलं असून भारताची फलंदाजी आक्रमक करण्यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याच मोठ योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या कसोटी इतिहासांत सेहवाग सर्वांत महत्त्वाचा फलंदाज असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. (Virendra Sehwag changed the Indian batting says Pakistan former spiner Saqlain Mushtaq)
भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वांत स्फोटक फलंदाज म्हणून सेहवागला ओळखलं जात. सेहवागचा कसोटी सामन्यांत स्ट्राइक रेट 82.2, एकदिवसीय सामन्यांत 104.3 आणि टी-20 मध्ये 145.3 इतका होता. त्यामुळे सकलैन यांच्यामते भारताची आजची आक्रमक फलंदाजीमागे सेहवागने रचलेला पायाच महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे सेहवागने कसोटीतील आपले पहिले त्रिशतक हे सकैलन यांच्या चेंडूवर सिक्सर ठोकत पूर्ण केले होते. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सकलैन म्हणाले, “संपूर्ण जागतिक क्रिकेटवर सेहवागच्या फलंदाजीचा वेगळा प्रभाव होता. त्याच्या आक्रमक क्रिकेटचा अनेक भारतीय फलंदाजाना फायदा झाला. त्याच्या फलंदाजीच्या स्टाईलने भारतीय क्रिकेटची मानसिकताच बदलून ठेवली.”
सेहवागची विव रिचर्डस यांच्याशी तुलना
सकलैन म्हणाले, ”सेहवागने स्वत:साठी खेळतानाच देशासाठी खेळणे ही तितकेच महत्त्वाचे समजले. ज्यामुळे येणाऱ्या फलंदाजाची मानसिकता त्याने बदलली. सेहवाग आधी वेस्ट इंडिज संघाचे दिग्गज क्रिकेटर सर विवियन रिचर्डसही अशी फलंदाजी करत. त्यांनी फलंदाजीतून जगावर राज्य केलं तसाच दबदबा सेहवागने देखील प्रस्थापित केला.”
हे ही वाचा :
टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला
दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!
(Virendra Sehwag changed the Indian batting says Pakistan former spiner Saqlain Mushtaq)