IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती
चेन्नई सुपरकिंग्स संघ यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांच्या नावाला शोभेशी कामगिरी करत आहे. त्यांनी आतापर्यंत 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. ज्यामुळे ते सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहेत.
IPL 2021: आयपीएलचा (IPL 2021) यंदाचा हंगाम आता हळूहळू पुढे सरकत असल्याने लवकरच बाद फेरीचे सामने सुरु होतील. यासाठी अव्वल चार संघ प्लेऑफच्या शर्यतीत जातील. ज्यात सध्या सर्वात अव्वलस्थानी एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) हा संघ आहे. दरवर्षी अप्रतिम कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यंदाही त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे 10 पैकी 8 सामने चेन्नईने जिंकले आहेत. त्यामुळे कोणत्याच संघाला त्यांना पराभूत करणं अवघड झालं आहे. अशावेळी माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) याने एक कानमंत्र देत चेन्नई संघाला पराभूत करण्याची युक्ती दिली आहे.
सेहवागने चेन्नईच्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यासोबतच्या सामन्यानंतर चेन्नईच्या रणनीतीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सेहवागच्या मते चेन्नईची गोलंदाजी कमकुवत आहे. ज्याचा प्रत्यय केकेआर विरुद्धच्या सामन्यात आला. कारण केकेआरचा फॉर्म पाहता चेन्नईचा संघ त्यांना लवकर सर्वबाद करु शकला असता, पण तरी केकेआरने 165 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर जाडेजाच्या धडाकेबाज खेळीने त्यांना तारले. त्यामुळे सेहवागच्या मते चेन्नई संघाविरुद्ध उत्तम फलंदाजी करुन त्यांना विजयापासून रोखले जाऊ शकते. तसेच सेहवागने हे देखील सांगितले की, चेन्नईची गोलंदाजी काहीशी कमकुवत असली. तरी त्यांच्या इतर बाजू अत्यंत भक्कम असल्याने त्यांना पराभूक करणे तसे अवघड आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचे उर्वरीत सामने
– 30 सितंबर (गुरुवार): चेन्नई vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 02 ऑक्टोबर (शनिवार): चेन्नई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 04 ऑक्टोबर (सोमवार): चेन्नई vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): चेन्नई vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, दुबई
हे ही वाचा
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, निवृत्तीबाबत म्हणाला…
IPL 2021 : हॅट्रिकदरम्यानचा ‘तो’ चेंडू सर्वोत्तम, हर्षल पटेलकडून फेव्हरेट विकेटचा खुलासा
IPL वर नजर, लक्ष्य T-20 वर्ल्डकपवर, सामन्यानंतर विराटची आऊट ऑफ फॉर्म इशान किशनसोबत सिरियस चर्चा