अजिंक्य रहाणेला संघातून कधी बाहेर कराव?, दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दिलं उत्तर, म्हणाला…

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला इंग्लंड दौऱ्यात कास कामगिरी करता आली नाही. एका अर्धशतकाशिवाय त्याला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आला नाही.

अजिंक्य रहाणेला संघातून कधी बाहेर कराव?, दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दिलं उत्तर, म्हणाला...
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 6:00 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळ केला आहे. भारताने दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाला (Australia Team) त्यांच्याच भूमीत मात देत गावस्कर बॉर्डर ट्रॉफी मिळवली. यावेळी विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत भारताची धुरा सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेला आता मात्र टीकांचा धनी व्हावं लागलं आहे. इंग्लंड दौऱ्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती. यावरच भाष्य करताना भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) त्याच मत देत रहाणेला कधी संघाबाहेर केलं पाहिजे याच उत्तरही दिलं आहे.

सेहवागने सोनी स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना अजिंक्य रहाणे आणि त्याच्या संघातील स्थानाबाबत त्याचं मत दिलं. यावेळी सेहवागच्या मते रहाणेला आणखी एक संधी मिळणं गरजेचं आहे. असं सेहवागनं म्हटलं आहे. याच कारणंही सेहवागने दिलं आहे. सेहवागच्या मते परदेशात कायम चांगली कामगिरी करणं शक्य नसतं अशावेळी आपला खेळ पुन्हा पहिल्या सारखा करण्यासाठी एखादी घरगुती मालिका खेळणं आवश्यक असतं. त्यामुळे भारताता न्यूझीलंड संघ कसोटी मालिका खेळायला येणार असून त्यावेळी रहाणेला संधी देऊन पाहावं, असं सेहवागचं मत आहे. तसचं त्यावेळीही त्याने खराब कामगिरी केल्यास त्याला विश्रांती द्यावी असंही सेहवागनं म्हटलं.

इंग्लंडच्या मालिकेत रहाणे

इंग्लंड मालिकेत सुरुवातीपासूनच अजिंक्यला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता येत नसून तो संपूर्ण मालिकेत केवळ 109 धावा करु शकला आहे. यामध्ये लॉर्ड्सच्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात मधली फळी सांभाळत 61 धावा केल्या होत्या. याशिवाय मालिकेत त्याला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. अजिंक्यने पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा केल्या. त्या सामन्यात भारताला पावसामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करता आली नाही. ज्यानंतर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात एक धाव करुन बाद झालेल्या अजिंक्यने दुसऱ्या डावांत मात्र 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

दुसऱ्या कसोटीनंतर रहाणे पुन्हा पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 18 आणि दुसऱ्या डावात 10 धावा करत त्याने पुन्हा सर्वांची निराशा केली. त्यानंतर चौथ्या कसोटीत पहिल्या डावात केवळ 14 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात रहाणेला साधे खातेही खोलता आले नाही. त्यानंतर पाचवी कसोटी रद्द झाली असल्याने रहाणे आता पुढील दौऱ्यात संघात असणार का? यावर प्रश्नचिन्हच आहे.

इतर बातम्या

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

PHOTO : चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उर्वरीत IPL मध्ये सर्वात घातक?, ‘या’ पाच खेळाडूंनी स्पर्धेआधीच दाखवला जलवा

(Virendra sehwag says when it will time to remove ajinkya rahane from indias sqaud)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.