Happy Birthday Sunil Gavaskar : वीरेंद्र सेहवागच्या गावस्करांना हटके शुभेच्छा, मजेशीर व्हिडीओ केला पोस्ट

अनेक वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रहात फलंदाजीची मदार पेलणाऱ्या सुनील गावस्करांचा आज वाढदिवस. अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून वीरेंद्र सेहवागने मात्र हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Sunil Gavaskar : वीरेंद्र सेहवागच्या गावस्करांना हटके शुभेच्छा, मजेशीर व्हिडीओ केला पोस्ट
वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 12:41 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 10 जुलै 1949 रोजी गावस्कर यांचा बॉम्बे (आता मुंबई) येथे जन्म झाला होता. अनेक वर्षे भारतीय फलंदाजीची मदार खांद्यावर पेलणाऱ्या गावस्करांवर आज सर्वचजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण या सर्वांमध्ये वीरेंद्र सेहवागने थोड्या हटके शुभेच्छा देत गावस्करांना बर्थडे विश केलं आहे. सेहवागने गावस्करांच्याच एका कॉमेन्ट्रीच्या व्हिडीओतील छोटासा भाग पोस्ट करत त्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे.

सेहवागने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये गावस्कर एका सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना कोणतातरी संदर्भ देत ‘मला तुमच्याशी काही बोलायचं नाही चल फुट इथून’ असा अस्सल मुंबईच्या बोलीत बोलत आहेत. सेहवागने नेमका हाच भाग पोस्ट करत अशाचप्रकारे गावस्कारांना बाद करु पाहणाऱ्या गोलंदाजाना ते ‘चल फुट’ करत असं सेहवागने लिहिलं आहे. सोबतच महान दिग्गज सुनील गावस्करांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशी फटकेबाजी करत राहा अशा शुभेच्छाही सेहवागने दिल्या आहेत.

17 वर्षे जगभरातील गोलंदाजावर केलं राज्य

स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजीनंतर 1971 साली वेस्ट इंडीज दौऱ्यावर गावस्कर यांचे भारतीय संघात पदार्पण झाले. पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे गावस्कर खेळू शकले नाही. पण पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्या सामन्यात 65  आणि नाबाद 67 धावांची खेळी केली.  भारताला विजय मिळवून देत त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या फलंदाजीने वेस्ट इंडिज संघाला सळो की पळो केले आणि 4 सामन्यांच्या मालिकेत तीन शतक आणि एक दुहेरी शतक ठोकत  774 धावा केल्या. सलामीच्या मालिकेत इतका मोठा स्कोर करण्याचा गावस्करांचा रेकॉर्ड आजही कोणी तोडू शकलेले नाही. पहिल्या मालिकेतील अप्रतिम कामगिरीनंतर पुढील 17 वर्षे गावस्कर भारताचे  सलामीवीर राहिले. त्याकाळात विना हॅल्मेट क्रिकेट खेळले जात आणि अशातही गावस्करांनी न घाबरता अत्यंत खरनाक गोलंदाजाविरुद्ध धावांचे डोंगर उभे केले. त्यामुळेच निवृत्त होताना गावस्करांच्या नावावर अनेक रेकॉर्ड होते. त्यांनी टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं (34) आणि धावांचा (10122) रेकॉर्ड बनवला. ते जगातील पहिले फलंदाज ठरले ज्यांनी तीन वेळा एका कसोटीतील दोन्ही डावांत शतक ठोकले. 10 हजार टेस्ट रन बनवणारेही ते पहिलेच फलंदाज ठरले. यष्टीरक्षक नसूनही त्यांनी कसोटीत 100 झेल टिपले होते.

हे ही वाचा :

Birthday Special : जन्मानंतर रुग्णालयातच बदली झाला, पुढे जाऊन जगातील महान फलंदाज बनत गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला, 4 सामन्यांत 774 धावा ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू

IND vs SL : भारत श्रीलंका सामन्यांवर कोरोनाचे संकट, कोरोनाच्या शिरकावामुळे भारतीय खेळाडू पुन्हा विलगीकरणात, सामन्याच्या वेळापत्रकात बदल

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

(Virendra Sehwag Wish Happy Birthday Sunil Gavaskar In Diffrent Way Posted Video How Gavskar Reacts Bowlers Who trying to Out them)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.