IPL 2021 : दुनिया हिला देंगे हम…, BCCI चा मोठा निर्णय, दोन वर्षांनी प्रेक्षक मैदानात परतणार!
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल.
दुबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. या हंगामाबाबत BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅच पाहता येणार आहे. स्टेडियममध्ये मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे 2 मे रोजी आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले. यावेळी 29 सामने झाले होते. तर 31 सामने शिल्लक आहेत. दरम्यान आता बीसीसीआयने हे उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल.
यंदाचा हंगाम आता तितकाच महत्त्वाचा असेल, कारण कोरोना स्थितीनंतर चाहते पुन्हा स्टेडियममध्ये परतत आहेत, असं आयपीएलच्या निवेदनात म्हटलंआहे.
आयपीएलमध्ये कोण कोणत्या स्थानी?
आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुणतालिकेचा विचार करता रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 5 सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 10 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्स (8), राजस्थान रॉयल्स (6), पंजाब किंग्स (6), कोलकाता नाइट रायडर्स (4) आणि सनरायझर्स हैदराबाद (2) हे संघ अनुक्रने चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्स : 8 पैकी 6 सामन्यात विजयी
– 22 सप्टेंबर (बुधवार): दिल्ली vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): दिल्ली vs राजस्थान रॉयल्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 28 सप्टेंबर (मंगळवार): दिल्ली vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता शारजाह – 02 ऑक्टोबर (शनिवार): दिल्ली vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 04 ऑक्टोबर (सोमवार): दिल्ली vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): दिल्ली vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
चेन्नई सुपरकिंग्स : धोनी पुन्हा विजयासाठी सज्ज
– 19 सितंबर (रविवार): चेन्नई vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 24 सितंबर (शुक्रवार): चेन्नई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सितंबर (रविवार): चेन्नई vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 30 सितंबर (गुरुवार): चेन्नई vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 02 ऑक्टोबर (शनिवार): चेन्नई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 04 ऑक्टोबर (सोमवार): चेन्नई vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): चेन्नई vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, दुबई
रॉयल चँलेजर्स बंगळुरु : यंदा विराट विजयाच्या दिशेने आक्रमक
– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
मुंबई इंडियन्स : सहाव्यांदा विजयश्री रोहितच्याच हातात?
– 19 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 26 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी
राजस्थान रॉयल्स : यंदाही राजस्थानची नौका स्थिर नाहीच
– 21 सप्टेंबर (मंगळवार): राजस्थान vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): राजस्थान vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 27 सप्टेंबर (सोमवार): राजस्थान vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): राजस्थान vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 02 ऑक्टोबर (शनिवार): राजस्थान vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 05 ऑक्टोबर (मंगळवार): राजस्थान vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 07 ऑक्टोबर (गुरुवार): राजस्थान vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
पंजाब किंग्स : बाद फेरीत पोहोचणेही कठीण
– 21 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): पंजाब vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 28 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 01 ऑक्टोबर (शुक्रवार): पंजाब vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): पंजाब vs आरसीबी, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 07 ऑक्टोबर (गुरुवार): पंजाब vs आरसीबी, दुपारी 3:30 वाजता, दुबई
कोलकाता नाइट रायडर्स : पुन्हा खराब खेळ
– 20 सप्टेंबर (सोमवार): केकेआर vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 23 सप्टेंबर (गुरुवार): केकेआर vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 26 सप्टेंबर (रविवार): केकेआर vs चेन्नई सुपरकिंग्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 28 सप्टेंबर (मंगळवार): केकेआर vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 01 ऑक्टोबर (शुक्रवार): केकेआर vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): केकेआर vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): केकेआर vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
सनरायजर्स हैद्राबाद : गुणतालिकेत सर्वात खाली
– 22 सप्टेंबर (बुधवार): हैद्राबाद vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): हैद्राबाद vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी
संबंधित बातम्या
PHOTO : षटकारांचा पाऊस पाडणारे धडाकेबाज, IPL मधील सिक्सर किंग कोण कोण?
IPL 2021 : डिव्हिलियर्सचा धमाका, सराव सामन्यात वादळी शतक, RCB ने रणशिंग फुंकलं