व्हीव्हीएस लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादची साथ सोडणार, क्रिकेट कामेंट्रीदेखील बंद; जाणून घ्या कारण
व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आता सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये दिसणार नाही. आगामी काळात तो कोणत्याही क्रिकेट सामन्याचे समालोचन करतानादेखील दिसणार नाही. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे लक्ष्मणला राहुल द्रविडचे पद मिळाले आहे.
मुंबई : व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आता सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये दिसणार नाही. आगामी काळात तो कोणत्याही क्रिकेट सामन्याचे समालोचन करतानादेखील दिसणार नाही. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे लक्ष्मणला राहुल द्रविडचे पद मिळाले आहे. होय, भारतीय क्रिकेटमध्ये व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणची जबाबदारी वाढली आहे, ज्यासाठी त्याला सनरायझर्स हैदराबाद आणि कॉमेंट्री बॉक्सपासून दूर राहावे लागणार आहे. खरे तर लक्ष्मण आता NCA म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष बनला आहे. राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर एनसीएच्या प्रमुखाची खुर्ची रिकामी झाली होती. त्याजागी लक्ष्मणची वर्णी लागली आहे. (VVS Laxman to leave Sunrisers Hyderabad, will stop cricket commentary also)
मात्र, यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणने ही जबाबदारी सांभाळण्यास नकार दिला होता. मात्र बीसीसीआयने त्याचे मन वळवल्यानंतर लक्ष्मणने यासाठी होकार दिला आता त्याला NCA चा नवीन बॉस म्हटले जाईल. लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख बनल्याची माहिती बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, लक्ष्मणने अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण पदभार स्वीकारू शकतो.
लक्ष्मणला एनसीए प्रमुख बनवण्याचा फायदा
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने TOI ला सांगितले की, “लक्ष्मणने स्वतःच्या अटींवर NCA प्रमुख होण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह लक्ष्मणला एनसीए प्रमुख बनवण्यासाठी उत्सुक होते. कारण द्रविड आणि लक्ष्मण यांचं चांगलं बाँडिंग आहे आणि ते टीम इंडिया आणि एनसीए यांच्यातील सेतू म्हणून काम करेल. लक्ष्मणच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींवर काम सुरू आहे. पण त्याने आधीच त्याच्या कल्पना NCA सोबत शेअर करायला सुरुवात केली आहे.”
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, लक्ष्मणचे एनसीएचे प्रशिक्षक बनणे हा दीर्घ प्रक्रियेचा भाग आहे. सौरव गांगुली आणि जय शाह यांच्याशीही त्याचे संभाषण बराच काळ चालले. एनसीए प्रमुख बनताना लक्ष्मणसमोर सर्वात मोठा पेच होता तो हैदराबादहून कुटुंबासह बंगळुरूमध्ये स्थायिक होण्याचा. यावर चर्चा झाली. त्याने याबद्दल सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीशीही बोलून घेतले, या संघाचा तो एक मार्गदर्शक आहे. मात्र, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.”
सूत्रांच्या माहितीनुसार लक्ष्मणने यापूर्वी एनसीए प्रमुख होण्यास नकार दिला होता. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात त्याने अधिक रस दाखवला होता. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक होण्यास नकार दिल्यास लक्ष्मण हा दुसरा पर्याय असेल, असे ठरले होते.
इतर बातम्या
न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मॅच, भारत पाकिस्तानसारखी का होते? काय आहे स्पेशल कारण??
विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी
(VVS Laxman to leave Sunrisers Hyderabad, will stop cricket commentary also)