AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WAUS 3rd Odi Live Streaming | तिसरा आणि अंतिम सामना कधी कुठे पाहता येणार?

Womens India vs Womens Australia 3rd Odi Live Streaming | कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि वूमन्स टीम इंडियासाठी तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर तिसरा सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

WIND vs WAUS 3rd Odi Live Streaming | तिसरा आणि अंतिम सामना कधी कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 2:52 PM

मुंबई | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. वूमन्स ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात 3 धावांनी थरारक विजय मिळवत मालिका जिंकली. त्याआधी ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने टीम इंडियावर मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती. टीम इंडियाने जवळपास दुसऱ्या सामन्यात विजय मिळवलाच होता. मात्र ऑस्ट्रेलियाने ऐन क्षणी सामना फिरवला आणि 3 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे मालिका खिशात घातली.

ऑस्ट्रेलिया या मालिकेत आता 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. आता टीम इंडियासाठी तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा आहे. टीम इंडियासमोर तिसरा सामना जिंकून लाज वाचवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. हा तिसरा सामना कधी कुठे होणार हे जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया तिसरा सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना हा मंगळवारी 2 जानेवारीला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

वूमन्स टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, श्रेयंका पाटील, स्नेह राणा, रेणुका ठाकूर सिंग, शफाली वर्मा, सायका इशाक साधू, मन्नत कश्यप

वूमन्स टीम ऑस्ट्रेलिया | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅश्ले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन, मेगन शूट, जेस जोनासेन आणि हेदर ग्रॅहम.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.