Wanindu Hasaranga RCB IPL 2022: ज्याला बाहेर बसवलं, तोच बनला आजच्य मॅचचा स्टार, RCB चे 10.75 कोटी रुपये फुकट नाही जाणार

Wanindu Hasaranga RCB IPL 2022: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (KKR vs RCB) सामना सुरु आहे. कोलकात्याचा डाव 128 धावात आटोपला.

Wanindu Hasaranga RCB IPL 2022: ज्याला बाहेर बसवलं, तोच बनला आजच्य मॅचचा स्टार, RCB चे 10.75 कोटी रुपये फुकट नाही जाणार
IPL 2022: RCB वानिंदु हसरंगाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:13 PM

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (KKR vs RCB) सामना सुरु आहे. कोलकात्याचा डाव 128 धावात आटोपला. कागदावर बळकट वाटणारी कोलकाताची फलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजीसमोर ढेपाळली. खरंतर आजच्या सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आहे. मागच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांना 206 धावांचं मोठ लक्ष्य असूनही पंजाब किंग्सला (Punjab Kings) रोखला आलं नव्हतं. पंजाब किंग्सने आरामनात हे लक्ष्य पार केलं होतं. त्यावेळी आरसीबीची गोलंदाजीच त्यांचा कमकुवत दुवा असल्याचा अंदाज सर्वांनी बांधला होता. आजच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले. त्यांच्या गोलंदाजीसमोर केकेआरचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. RCB चा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा सर्वात घातक ठरला.

RCB चा निर्णय चुकला नव्हता

त्याला आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळी अनेकांनी आरसीबीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आज वानिंदु हसरंगाने RCB चा निर्णय किती योग्य होता? ते सिद्ध करुन दाखवलं. हसरंगाने आज आपल्या फिरकीची कमाल दाखवली. त्याने चार षटकात 20 धावा देत चार विकेट घेतल्या. वानिंदु हसरंगाने सर्वातआधी केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरला आऊट केलं. लाँग ऑनवर विराट कोहलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर सुनील नरेसनला सुद्धा स्वस्तात माघारी पाठवलं. नरेन फिरकी गोलंदाजीवर मोठे फटके खेळतो. पण हसरंगाने आपल्या जाळ्यात त्याला अडकवलं. त्याने फक्त 12 धावा केल्या.

त्या सीजनमध्ये हसरंगाला एकही विकेट मिळाला नव्हता

पुढच्याच चेंडूवर हसरंगाने शेल्डन जॅक्सनला क्लीनबोल्ड केलं. टिम साउदीच्या रुपात हसरंगाने चौथा विकेट काढला. मोठा फटका खेळण्याच्या नादात फाफ डु प्लेसीसकडे त्याने सोपा झेल दिला. हसरंगाने चार षटकात 20 धावा देत चार विकेट काढल्या. मागच्या सीजनमध्येही हसरंगा आरसीबीकडून खेळला होता. त्या सीजनमध्ये हसरंगाला एकही विकेट मिळाला नव्हता. दोन-तीन सामन्यानंतर त्याला बाहेर बसवलं होतं. पण आयपीएल 2022 च्या आरसीबीने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.