लेकरांना क्रिकेटर करायचंय? अंडर-19 एशिया कपच्या कप्तानाची ही बातमी तुम्हाला प्रेरणा देईल
यशमध्ये क्रिकेटचे गुण आहेत हे नेमकं कुणी हेरलं? आई की वडील? त्याचे वडील विजय याचं उत्तर देतात. ते म्हणाले यश हा चार वर्षाचा असतानाच त्याला बॉलचा सेन्स असल्याचं त्याच्या आईनं हेरलं. त्या चार वर्षाच्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचं तिलाच दिसलं.
बीसीसीआयनं अंडर -19 एशिया कपसाठी काल 20 खेळाडूंच्या टीमची घोषणा केलीय. ह्या टीममध्ये महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आलीय. त्यात राजवर्धन हंगरगेकर जो तुळजापूरचा आहे मुळचा आणि जुन्नरच्या कौशल तांबेचा समावेश आहे. एशिया कप हा यूएईत खेळवला जाणार आहे. आणि टीम इंडियाचं नेतृत्व दिल्लीच्या यश धूलकडे देण्यात आलंय. यशच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकली तर तो काही पहिल्यांदाच कप्तानी करतोय असं नाही. अंडर-14, अंडर-16 आणि आता अंडर-19 अशा वेगवेगळ्या टीमचं त्यानं नेतृत्व केलेलं आहे. त्या जडणघडणीत अर्थातच त्याच्या आई वडील-आजोबांचा मोठा वाटा आहे. त्यातही आईनं त्याला हेरलं आणि बापानं त्याला घडवलं असं म्हणावं लागेल.
यशची पहिली प्रतिक्रिया बीसीसीआयनं अंडर-19 एशिया कपसाठी यशचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया काय असावी? टाईम्स ऑफ इंडियानं त्याला याबद्दल बोलतं केलंय. तो म्हणाला, जस्ट मी आता कुठे स्टार्ट करतोय. त्याच्या बोलण्यात ना कुठला आनंद होता ना थरथर. स्थिरता होती असं रिपोर्टरनं लिहिलं आहे. यश हा अंडर-16 पासूनच दिल्लीला लीड करतोय. त्यामुळे अंडर-19 हा काही त्याच्यासाठी पहिला प्रयोग नाही, किंवा प्रयत्नही नाही. त्यावर तो म्हणतो, मी जर प्रामाणिकपणे खेळत राहिलो तर एका चांगल्या लेवलला मी नक्की पोहोचेन. क्रिकेट हेच यशचं जीवन आहे. मोबाईल असो की घरात टीव्ही, तो क्रिकेटशिवाय काही पहात नाही. त्याला रोल मॉडेल कोण आहे म्हणून विचारलं तर म्हणतो, माझा कुणी रोल मॉडेल नाही. जो कुणी इंटरनॅशनल लेव्हलवर खेळतो त्या प्रत्येकाकडून काहीना काही शिकण्यासारखं असतं. मी प्रत्येकाचा खेळ जवळून बघतो. मी कुणाची कॉपी करत नाही. प्रत्येक जण माझा हिरो.
आई वडीलांचा त्याग यशचं कुटूंब मध्यमवर्गीय आहे. एक काळ असा होता की, फक्त मुंबई दिल्लीसारख्या त्यातही श्रीमंत घरातूनच क्रिकेटपटू यायचे. गेल्या काही वर्षात मात्र हे चित्रं झपाट्यानं बदललंय. यश धूलही त्याच पंगतीत मोडतो. यशच्या कुटूंबालाही त्याचा क्रिकेटचा शौक पुरवताना चांगल्याच खस्ता खाव्या लागल्यात. त्यात आई वडील आणि आजोबा तिघेही महत्वाचे आहेत. आजोबा हे भारतीय लष्करातून निवृत्त झालेत. त्यांच्या पेन्शनवर घर चालतं. कारण यशला वेळ देण्यासाठी वडील विजय यांना कायम जॉब बदलत रहावा लागलाय. सध्या ते एका फार्मा कंपनीत एक्झिक्युटीव्ह आहेत. ते म्हणाले- यशच्या क्रिकेटसाठी वेळ मिळावा म्हणून मी वारंवार जॉब सोडलेत. कारण कुटूंबाची तोच पहिली प्रायोरिटी आहे. अगदी कमी वयापासून त्याला क्रिकेटचं बेस्ट किट कसं मिळेल हे बघितलं. त्याच्याकडे एक चांगली बॅट नव्हती. मी ती अपग्रेड करत राहीलो. त्यासाठी आम्हाला कुटूंबाच्या बजेटमध्ये काटकसर करत राहावी लागली. यशनेही घरातली ही आर्थिक कसरत जवळून पाहिलीय. त्यालाही घर कसं चालतं याचं आश्चर्य वाटतं.
आईनं हिरा ओळखला यशमध्ये क्रिकेटचे गुण आहेत हे नेमकं कुणी हेरलं? आई की वडील? त्याचे वडील विजय याचं उत्तर देतात. ते म्हणाले यश हा चार वर्षाचा असतानाच त्याला बॉलचा सेन्स असल्याचं त्याच्या आईनं हेरलं. त्या चार वर्षाच्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचं तिलाच दिसलं. त्यानंतर आजोबा आणि वडीलांना वाटलं की हाच तो चार वर्षाचा मुलगा आहे जो पुढे मोठा क्रिकेटर होऊ शकतो. आणि आता तोच मुलगा अंडर-19 एशिया कपसाठी देशाचं नेतृत्व करणार आहे. याआधी त्यानं 12 वर्षाचा असताना अंडर-14 मध्ये दिल्लीचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. अंडर-16 पंजाबविरूद्ध खेळताना यशनं 185 रन्सची इनिंग खेळली त्यानं त्याला कायमचा आत्मविश्वास दिला.
हे सुद्धा वाचा:
ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ
Travel Special : भारतामधील ‘या’ रेल्वे स्टेशनची नावे ऐकून तुम्ही पोटधरून हसाल!