मुंबई : भारत पाकिस्तान मॅच संपून तीन दिवस उलटून गेलीयत तरी मॅचसंबंधी चर्चा काही संपत नाहीय. या मॅचसंबंधी बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिसने धक्कादायक वक्तव्य केलं. मात्र आता सगळीकडून टीकेची झोड उठल्यानंतर मला माफ करा, असं म्हणत वकारने आपला माफीनामा ट्विटरवरुन जाहीर केला आहे.
सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज अदा केला. या नमाजाबाबत वकारने एका पाकिस्तानी चॅनेलशी संभाषण करताना धक्कादायक वक्तव्य केले. “रिझवानने ‘हिंदूंमध्ये नमाज’ अदा केल्याचा तो गर्वाचा क्षण होता. रिजवानने हिंदूंमध्ये उभं राहून नमाज अदा केली, ही खूपच खास गोष्ट होती”, असं वकार म्हणाला.
वकारच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या वकार निशाण्यावर आला. भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी वकारला अतिशय कडक भाषेत सुनावलं. माझ्या आयुष्यातील सर्वांत नकारात्मक गोष्टींपैकी एक वक्तव्य आहे जे वकारने केलंय. आपल्यापैकी अनेकांनी याकडे लक्ष दिलं नाही. पण वकारचं वक्तव्य ऐकून मला त्रास झाला, अशी जळजळीत टीका हर्षा भोगले यांनी केली.
वकारने ट्विटरवरुन आपला माफीनामा प्रसिद्ध केला, ‘मी उत्साहाच्या भरात तसं वक्तव्य करुन गेलो. पण माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ लोकांनी घेतला, जे मला म्हणायचं नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी याबद्दल माफी मागतो, मला असं करायचे नव्हते. खरोखर चूक झाली. खेळ रंग-धर्माचा विचार न करता लोकांना जोडतो, असं वकार युनिस म्हणाला.
– “I never meant it, it was a Game & it was the heat of the moment, I apologise” @waqyounis99 clarifies on what happened earlier.
Still what a historic Game & Win it was for team Pakistan. Let’s move on!@bhogleharsha @asportstvpk #PakvsIndia #Pakistan #India #T20WorldCup pic.twitter.com/1mgsnyRfap
— Arsalan H. Shah ~ Proud Pakistani (@arsalanhshah) October 26, 2021
एआरवाय न्यूज टीव्हीशी बोलताना वकार म्हणाला होता, “बाबर आणि रिझवान यांनी ज्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने फटकेबाजी केली, स्ट्राइक रोटेट केली हे सगळं अविस्मरणीय होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ते पाहून आनंद झाले. विशेष म्हणजे, रिझवानने जे केले ते सर्वात खास होते, त्याने हिंदूंनी वेढलेल्या ग्राऊंडवर नमाज अदा केली, हे माझ्यासाठी खूप खास होते”, असं वादग्रस्त वक्तव्य वकारने केलं.
वकारच्या या विधानानंतर केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही जोरदार वाद झाला आणि अनेक लोकांनी त्याच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली. रिझवानने भारताविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या आणि पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
(Waqar younis Apology over mohammad Rizwan remark on offering namaz)
हे ही वाचा :
PAK vs NZ: न्यूझीलंडच्या कॉन्वेने टिपलेला झेल पाहून सर्वच चकीत, ‘क्रिकेटर कि सुपरमॅन?’, पाहा VIDEO