IND vs SL 3rd T20: तिसऱ्या T20 मध्ये ‘हा’ घातक खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतो गेम चेंजर

IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंकेमध्ये 3 T20 सामन्याची सीरीज सुरु आहे. 7 जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात कॅप्टन पंड्या 'या' घातक ऑलराऊंडरला प्लेइंग 11मध्ये स्थान देऊ शकतो.

IND vs SL 3rd T20: तिसऱ्या T20 मध्ये 'हा' घातक खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतो गेम चेंजर
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:45 PM

IND vs SL 3rd T20 Match: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. सीरीजचा शेवटचा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही टीम्समध्ये 7 जानेवारीला सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सामना खेळला जाईल. या मॅचसाठी कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग 11 मध्ये बदल करु शकतो. हार्दिक बेंचवर बसलेल्या एका खेळाडूचा टीममध्ये समावेश करु शकतो.

अजूनपर्यंत एकाही मॅचमध्ये संधी दिली नाही

हार्दिक पंड्याने कॅप्टन म्हणून आतापर्यंत एकही सीरीज गमावलेली नाही. श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या सीरीजमध्ये स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर टीमचा भाग आहे. पण त्याला अजूनपर्यंत एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. वॉशिंग्टन सुंदर अखेरच्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग बनू शकतो. मागच्या काही सामन्यात त्याला संधी मिळालीय. किफायती गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान देतो. कॅप्टन पंड्यासाठी वॉशिंग्टन सुंदर मॅचविनर ठरु शकतो.

तिन्ही फॉर्मेटमध्ये इतक्या धावा, काढल्या इतक्या विकेट?

वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळलाय. तो टीम इंडियासाठी 4 टेस्ट मॅच खेळलाय. यामध्ये त्याने 265 धावा आणि 6 विकेट घेतल्यात. 12 वनडे आणि 32 टी 20 सामने खेळलाय. वनडे मॅचेसमध्ये 212 रन्स आणि 14 विकेट काढल्यात. टी 20 मॅचेसमध्ये लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग केलीय. त्याने 47 रन्स आणि 26 विकेट काढल्यात. वॉशिंग्टन सुंदर आपला शेवटचा टी 20 सामना पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला होता. टी20 सीरीजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या, (कॅप्टन) सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.