Ind vs Eng : शुभमन गिलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी द्या, रनमशीन वसीम जाफरचा महत्त्वाचा सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (WTC final 2021) पराभवानंतर आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Ind vs Eng : शुभमन गिलच्या जागी 'या' खेळाडूला संधी द्या, रनमशीन वसीम जाफरचा महत्त्वाचा सल्ला
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 5:46 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (WTC final 2021) पराभवानंतर आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र या मालिकेआधीच भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती बुधवारी (30 जून) समोर आली. त्याला नेमकी काय दुखापत झाली आहे, हे जरी समोर आलं नसलं तरी तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. (Wasim Jaffer says Mayank Agarwal should Replace Shubman Gill in IND vs ENG test series)

शुभमनच्या पायाला (गुडघा आणि तळवा यांच्यामधील भाग) दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील काही काळ शुभमनला विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेचे सामने शुभमन मुकण्याची दाट शक्यता आहे. कदाचित पाचव्या सामन्यात शुभमन पुनरागमन करु शकतो, अशी माहिती समोर येत असून तूर्तास तरी त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील दोन महिने गिल क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी पीटीआयला दिली.

शुभमनच्या जागी कोणते पर्याय?

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळायची असून यावेळी शुबमनच्या जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याचा आहे. कारण याआधी इंग्लंड दौऱ्यावर मयांक इंग्लंड विरोधात सलामीला उतरला असून त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली होती. त्यानंतर गिलच्या जागेसाठी दुसरा प्रबळ दावेदार आहे भारताचा स्टार क्रिकेटर के. एल. राहुल (KL Rahul). राहुलने याआधी मुरली विजयसह मिळून भारतासाठी काही कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. लोकेश आणि मयंक यांच्याशिवाय आणखी एक फलंदाज सलामीसाठी उतरु शकतो. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari). दरम्यान या सर्व अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघाकडे आणखी एक खेळाडू सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. तो म्हणजे भारतीय संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran). 25 वर्षीय अभिमन्यूने 64 प्रथम श्रेणी सामन्यांत 4 हजार 402 धावा केल्या आहेत. 43.57 च्या सरासरीने केलेल्या या धावांमध्ये 13 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

जाफरच्या मते मयंक अग्रवालला संधी मिळावी

माजी भारतीय खेळाडू आणि दिग्गज फलंदाज वसीम जाफरला विश्वास आहे की, सलामीसाठी मयंक अग्रवाल हा एक चांगला पर्याय असेल, कारण त्याने याआधी मिळालेल्या संधीत चांगली कामगिरी केली आहे. मयंकने 2018-19 ऑस्ट्रेलिया दोऱ्यावर कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाचा सलामीवीर होता. तथापि, 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर सलग दोन सामन्यात अपयशी ठरल्याने मयंकऐवजी गिलला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. दुसरीकडे, केएल राहुल 2019 पासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव ‘या’ गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात ‘अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं’

WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली ‘ही’ परिस्थिती

(Wasim Jaffer says Mayank Agarwal should Replace Shubman Gill in IND vs ENG test series)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.