‘Wasim Jaffer नुसते फेव्हरेट नाही, सचिन, राहुल यांच्यापेक्षाही माझ्यासाठी मोठे’, आजच्या स्टार खेळाडूची भावना
वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, (Rahul Dravid) सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण अनेक वर्ष भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचे आधारस्तंभ होते.
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) फॅब 5 चा सर्वाधिक बोलबाला होता, त्या काळात वसीम जाफर (Wasim Jaffer) टीम इंडियामधून खेळले. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, (Rahul Dravid) सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण अनेक वर्ष भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचे आधारस्तंभ होते. या फलंदाजांमध्ये संधी मिळवणं आणि स्वत:च स्थान निर्माण करणं, कुठल्याही क्रिकेटपटूसाठी कठीण होतं. मात्र तरीही वसीम जाफरने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. 31 कसोटी सामन्यात त्याने 1944 धावा केल्या. यात पाच शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. वसीम जाफरने भारतासाठी दोन द्विशतक झळकावली. 2006 साली वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक 212 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध 202 धावा फटकावल्या. 2007 साली केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी अविस्मरणीय अशी शतकी खेळी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेवढी उंची गाठता आली नाही
देशांतर्गत क्रिकेटमध्ये वसीम जाफर यांनी खूप नाव कमावलं. रणजीसह अन्य फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्यांनी खोऱ्याने धावा केल्या. पण त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना तेवढी उंची गाठता आली नाही. मुंबई आणि विदर्भासाठी ते रणजी क्रिकेट खेळले. आजच्या अनेक नामांकीत खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेले क्रिकेटपटू आदर्श आहेत. पण हार्दिक पंड्या मात्र याला अपवाद आहे.
त्यांची फलंदाजी पाहूनच मी मोठा झालो
हार्दिक पंड्यासाठी वसीम जाफर त्याचे सर्वात आवडते क्रिकेटपटू आहेत. आजच्या अनेक क्रिकेटपटूंचे तेंडुलकर, द्रविड आणि लक्ष्मण हिरो आहेत. पण हार्दिक वसीम जाफर यांना मानतो. वसीम जाफर यांचा खेळ मला प्रचंड आवडायचा. त्यांची फलंदाजी पाहूनच मी मोठा झालो, असं हार्दिक म्हणाला. वसीम जाफर यांचा तो मोठा चाहता आहे. हार्दिक पंड्यासाठी लीजेंड म्हणजे महान क्रिकेटपटूंपेक्षाही वसीम जाफर मोठे आहेत.
इतरांप्रमाणे माझेही काही आवडते क्रिकेटपटू आहेत
“इतरांप्रमाणे माझेही काही आवडते क्रिकेटपटू आहेत. मला जॅक कॅलिस, विराट, सचिन सरांचा खेळ आवडतो. असे अनेक ग्रेट क्रिकेटपटू आहेत, ज्यांना तुम्हाला निवडता येणार नाही. वसीम जाफ रमाझे सर्वात आवडते क्रिकेटपटू आहेत. त्यांची फलंदाजी पाहताना नेहमीच मला आनंद मिळायचा. अन्य लीजेंडेसपेक्षाही मी त्यांना नेहमीच वरचं स्थान देईन. मी त्यांच्या फलंदाजीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्यामध्ये त्यांच्या फलंदाजीचा क्लास कधीच येणार नाही” असं हार्दिक एसजी पॉडकास्टमध्ये म्हणाला.