VIDEO: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामना पाहिला नाहीत?, ‘या’ 4 मिनिटांच्या व्हिडीओतून पाहा संपूर्ण सामना
भारतीय क्रिकेट संघाने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला आहे. आधी इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर आता ऑस्ट्रेलियालाही 9 विकेट्सने पराभूत केलं आहे.
दुबई: टी -20 विश्वचषकात भारतीय संघ सुपर 12 मध्ये असल्याने भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी आपली तयारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडियाने दोन सराव सामने खेळले. यामध्ये सोमवारच्या सराव सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज (20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यातही भारताने 9 विकेट्सनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्याबद्दल अनेकांना माहित नसल्याने हा सामना त्यांना पाहता आला नाही. तुम्हीही यापैकीच एक असाल तर चिंता नको या सामन्यातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी अर्थात हायलाईट्स तुम्हाला एका जवळपास 4 मिनिटाच्या व्हिडीओत पाहता येणार आहेत.
हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) त्याच्यां इन्स्टाग्रामवर पोस्ट केल आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडण्यापासून ते भारताने विजयी धाव करण्यापर्यंत सर्वकाही आहे. नेटकरीही या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत असून बरेच व्हयूय या व्हिडीओला मिळाले आहेत.
View this post on Instagram
भारतीय फिरकीपटूंची कमाल
सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजानी चांगलच जेरीस आणलं. विशेषत: फिरकीपटू आश्विन, जाडेजा आणि राहुल चाहरने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी आश्विनने 2, जाडेजाने, चाहर आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून केवळ स्मिथने (57) अर्धशतक झळकावलं. तर स्टॉयनीस (42) आणि मॅक्सवेलने (37) त्याला चांगली साथ दिली. ज्य़ाच्या जोरावर त्यांनी 152 धावा करत भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवले.
हिटमॅनचं अर्धशतक भारताचा विजय
153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच उत्तम केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. 39 धावा करुन राहुल बाद झाल्यानंतरही रोहितने सूर्याबरोबर सामना पुढे नेला. त्यानंतर 60 धावा करुन रोहित स्वत:हून विश्रांती घेण्यासाठी तंबूत परतला. ज्यानंतर सूर्या आणि हार्दीकने अनुक्रमे 38 आणि 14 धावा करत विजय भारताच्या नावे केला.
हे ही वाचा-
T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास
T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर
(Watch Full Highlight of India vs Australia T20 World Cups Warm up Match)