RSWS 2022: रिटायरमेंटनंतरही सचिन तेंडुलकरचा आजही तोच क्लास, त्याच्या दोन खणखणीत बाऊंड्री चुकवू नका, VIDEO
RSWS 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 मध्ये इंडिया लिजिंडसने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिका लिजिंडसवर 61 धावांनी विजय मिळवला.
मुंबई: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 मध्ये इंडिया लिजिंडसने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिका लिजिंडसवर 61 धावांनी विजय मिळवला. कानपूरमध्ये हा सामना खेळला गेला. इंडिया लिजिंडसकडून स्टुअर्ट बिन्नीने 42 चेंडूत 82 धावा फटकावल्या. राहुल शर्माने 17 धावात 3 विकेट घेतल्या. इंडिया लिजिंडसने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 217 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका लिजिंडस टीमने 9 बाद 156 धावा केल्या. सचिन तेंडुलकर इंडिया लिजिंडसचा कॅप्टन आहे.
1996 ची झलक दिसली
काल ज्यांनी हा सामना पाहिला, त्यांना सचिनच्या बॅटिंगमध्ये 1996 ची झलक दिसली. सचिन फार मोठी खेळी खेळला नाही. त्याने 15 चेंडूत 16 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत त्याने दोन बाऊंडी मारल्या. पण हे दोन्ही चौकार एकदम कडक होते. 90 च्या दशकातील सचिनच्या बॅटिंगची आठवण करुन दिली. सचिन ओव्हर द टॉप जो फटका खेळला, तो खूपच लाजबाव होता.
Sachin Tendulkar in action#sachin #SachinTendulkar #LegendsLeagueCricket #IndiaLegends #RoadSafetyWorldSeries2022 @mohsinaliisb pic.twitter.com/CimxmF7Rr9
— abhijeet Gautam (@gautamabhijeet1) September 10, 2022
हे दोन्ही फटके क्लासिक होते
टॉस जिंकून इंडिया लिजिंडसने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सचिन नमन ओझासोबत सलामीला आला. चौथ्या ओव्हरमध्ये सचिनने पहिला चौकार लगावला. मखाया निटीनी गोलंदाजी करत होता. त्याच्या लेंथ बॉलवर सचिन लॉफ्टेड शॉट खेळला. या चेंडूवर मिड-ऑनला बाऊंड्री गेली. त्यानंर जॉन वॅन डरच्या गोलंदाजीवर त्याने चौकार मारला. सचिनच्या बॅटमधून निघालेले हे दोन्ही फटके क्लासिक होते. 90 च्या दशकातील सचिनच्या बॅटिंगची आठवण करुन दिली.
Moment hai vai moment hai, 1996 wali vibe??#SachinTendulkar #RoadSafetyWorldSeries #IndiaLegends VC :- @ColorsTV pic.twitter.com/ymhB7EnHVA
— GOPAL JIVANI (@Haa_Haa_Medico) September 10, 2022
दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात, पण….
दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. 43 धावांची सलामी दिली होती. राहुल शर्माने पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेची 12 ओव्हर्समध्ये 4 बाद 90 अशी स्थिती होती. दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून जॉन्टी होऱ्ंडसने सर्वाधिक 27 चेंडूत 38 धावा केल्या. पण दक्षिण आफ्रिकेची टीम 156 धावसंख्येपर्यंत पोहचू शकली. इंडिया लिजिंडसने 61 धावांनी मॅच जिंकली.