MS धोनीसाठी कोणताही विचार न करता गोळी झेलेन, KL राहुलचं वक्तव्य
महेंद्रसिंग धोनी साठी कोणताही विचार न करता बंदुकीची गोळी झेलेन, असं वक्तव्य भारताचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज के एल राहुल यांनी केलंय. (We Could take A bullet For Ms Dhoni Says KL Rahul)
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) गणना सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये होते. क्रिकेट रसिक प्रेक्षकच नाही तर भारतीय संघातले खेळाडू देखील धोनीवर मनापासून प्रेम करतात… विदेशी खेळाडू धोनीवरुन जीव ओवाळून टाकतात… टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीदेखील (Virat Kohli) धोनीविषयीचे अनेक प्रसंग सांगताना हरखून जातो. धोनीचा मोठेपण सगळेजण सांगतात. आता वेळ होती ती भारताचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul) याची… परंतु के. एल. राहुलने धोनीचं मोठेपण सांगताना असं वक्तव्य केलंय, जे आजपर्यंत कुणीच केलं नव्हतं…! (We Could take A bullet For Ms Dhoni Says KL Rahul)
धोनीसाठी गोळी झेलेन…!
महेंद्रसिंग धोनी साठी कोणताही विचार न करता बंदुकीची गोळी झेलेन, असं वक्तव्य भारताचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज के एल राहुल यांनी केलंय. फोर्ब्स (Forbes) या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत के. एल. राहुलने धोनीविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मुलाखतीत त्याने धोनीचं मोठेपण सांगितलं.
“कर्णधार म्हणून एम. एस. धोनीने कायमच खेळाडूंचा सन्मान केला आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंच्या मनात एम एस धोनीबाबत एक वेगळा आदर आहे”, अशा प्रेमळ भावना केएल राहुलने मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. त्याच्याकडून खेळाडूंनी खूप काही शिकण्यासाखं आहे, असं के एल राहुल म्हणाला.
धोनीविषयी बोलताना के एल राहुल काय म्हटला…?
“कर्णधार म्हटलं की पहिलं नाव ओठावर येतं ते धोनीचं… धोनीने भारताला अनेक ट्रॉफी जिंकवून दिल्यात… तरीही त्याच्यातील एक नम्रता, शिस्त ही मोठी गोष्ट आहे…. आम्ही सर्व त्याच्या नेतृत्वात खेळतो… त्याने आतापर्यंत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिले….”
“आजही प्रत्येक जण त्याचा आदर करतो… आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारात तो नेहमी नम्र व्हायला राहिला…. हीच शिकवण त्याने संघातील खेळाडूंना दिली… देशासाठी त्यांने अनेक गोष्टी मिळवल्या…. कर्णधार म्हणून त्यांने कायमच संघातील खेळाडूंचा सन्मान केला… त्यामुळे इतरही सर्वच जण त्याचा आजही आदर करतात….. त्याच्यासाठी कोणताही विचार न करता मी अंगावर गोळी घेऊ शकतो… चढ-उतार आले तरी नम्र कसे राहावे हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे…”, असं के एल राहुल म्हणाला.
(We Could take A bullet For Ms Dhoni Says KL Rahul)
हे ही वाचा :