देशातील एक क्रीडा मंत्रीच रणजी स्पर्धेत खेळणार, मागच्यावर्षी जिंकली विधानसभा निवडणूक

क्रिकेट हा भारतातला सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे विविध नेते, मंत्री राज्य, देश पातळीवर क्रिकेटमध्ये प्रशासकाची भूमिका बजावत आहेत. पण आता देशातील एका राज्याचा मंत्रीच रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) खेळणार आहे.

देशातील एक क्रीडा मंत्रीच रणजी स्पर्धेत खेळणार, मागच्यावर्षी जिंकली विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 2:58 PM

कोलकाता: क्रिकेट हा भारतातला सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे विविध नेते, मंत्री राज्य, देश पातळीवर क्रिकेटमध्ये प्रशासकाची भूमिका बजावत आहेत. पण आता देशातील एका राज्याचा मंत्रीच रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) खेळणार आहे. पश्चिम बंगालचे क्रीडा राज्यमंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary) यांचा बंगालच्या 21 सदस्यीय रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. राजकारणात प्रवेश करुन अजून त्यांना वर्षही झालेलं नाही. मागच्यावर्षी त्यांनी तृणमुल काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. (West bengal sports minister Manoj Tiwary named in Bengal Ranji squad)

सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक खात्याचे राज्यमंत्री

36 वर्षीय मनोज तिवारी पश्चिम बंगालचे माजी कर्णधार आहेत. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक खात्याचे राज्यमंत्री सुद्धा आहेत. मार्च 2020 मध्ये ते पश्चिम बंगालकडून सौराष्ट्राविरुद्ध रणजीचा अंतिम सामना खेळले होते. हा त्यांचा शेवटचा सामना होता. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीआधी मनोज तिवारी यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व शिबपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या राथीन चक्रवर्ती यांचा पराभव केला.

ग्रुप बी मध्ये संघाचा समावेश

रणजी करंडक स्पर्धेत पश्चिम बंगालच्या संघाचा ग्रुप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात विदर्भ, राजस्थान, केरळ, हरयाणा आणि त्रिपुरा या संघाचा समावेश आहे. 13 जानेवारीपासून बंगळुरुमध्ये त्रिपुरा विरुद्धच्या सामन्याने पश्चिम बंगालच्या रणजी अभियानाला सुरुवात होणार आहे. रविवारी बंगाल संघातील सहाय्यक कोचसह सात जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीमध्ये बाधा निर्माण झाली आहे. बंगळुरुला जाण्याआधी 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम बंगालचा संघ पृथ्वी शॉ च्या मुंबई संघाविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलिसांकडून शिका, दिल्ली पोलिसांना ट्विटरवर सल्ला, #MumbaiPolice ट्रेडिंग, बुल्लीबाई केसचं काय आहे कनेक्शन?

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?

राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना

(West bengal sports minister Manoj Tiwary named in Bengal Ranji squad)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.