IPL 2021: राजस्थान रॉयल्सचं डुबतं जहाज सावरण्यासाठी ‘हे’ दोघे सज्ज, वेस्ट इंडिजचे धाकड खेळाडू आता राजस्थानमध्ये

राजस्थान रॉयल्स संघात दुखापतींसह इतर कारणांमुळे दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर जात आहेत. अशावेळी वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडूंना करारबद्ध करत राजस्थानने एक नवा डाव टाकला आहे.

IPL 2021: राजस्थान रॉयल्सचं डुबतं जहाज सावरण्यासाठी 'हे' दोघे सज्ज, वेस्ट इंडिजचे धाकड खेळाडू आता राजस्थानमध्ये
राजस्थान रॉयल्स संघ
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 5:12 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठीच्या सामन्यात खेळताना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाची मोठी दमछाक होणार आहे. कारण संघातील दिग्गज खेळाडू विविध कारणांमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत.  बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर लियाम लिव्हिंगस्टोनला यांच्यासारखे दिग्गज आपआपल्या कारणामुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत. पण याच वेळी संघाला सावरण्यासाठी संघ प्रशासनाने वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हीन लुईस (Evin lewis)आणि जलदगती गोलंदाज ओशाने थॉमस (oshane thomas) यांना करारबद्ध केले आहे.

काही दिवसांपूर्वी जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाज असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाच्या तबरेज शम्सीला (Tabraiz Shamsi) राजस्थानने अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी घेतलं. त्यानंतर आता वेस्ट इंडिजचा धुरंदर सलामीवीर लुईसला संघात घेतलं आहे. त्याने आतापर्यंत शंभरहून अधिक षटकार खेचले असून त्याची आयपीएलमधील मुंबई इंडियन्सकडूनची कामगिरीही भारी आहे. दुसरा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा थॉमस हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बदली खेळाडू म्हणून घेतलं आहे.

राजस्थानचे खेळाडू एका मागोमाग एक बाहेर

सर्वात आधी दुखापत झाल्यामुळे जोफ्रा आर्चरने माघार घेतली. ज्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी खाजगी कारणं देत स्पर्धेला राम राम ठोकला. आता फलंदाज लियामला इंग्लंडमध्ये वारविकशायर आणि लँकशायर दरम्यान सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या (county championship) एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. सीमारेषेवर चौैकार अडवताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली असल्याने तोही उर्वरीत आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर

IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट

IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून ‘या’ युवा खेळाडूची निवड

(West indies batsmans Evin lewis and oshane thomas in Rajsthan royals for ipl 2021)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.