World cup 2023 | पाकिस्तान लाख प्रयत्न करुनही नाही जिंकणार WC, ‘ही’ 5 कारणं बाबर अँड कंपनीला बुडवणार
World cup 2023 | पाकिस्तानी टीममध्ये अशा कुठल्या पाच कमतरता आहेत, ज्यामुळे त्यांचं वर्ल्ड कप जिंकण कठीण दिसतय. पाकिस्तानच जे मुख्य शक्तीस्थळ होतं, तीच आता त्यांची मोठी कमजोरी ठरतेय. त्यामुळे पाकिस्तानी टीम या सगळ्यांवर मात कशी करणार? हा मुख्य प्रश्न आहे.
हैदराबाद : वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान टीम आपला पहिला सामना नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. हैदराबाद येथे होणारा सामना पाकिस्तानसाठी सोपा मानला जात आहे. कारण नेदरलँड्सच्या टीमकडे भारतीय उपखंडात खेळण्याचा फार अनुभव नाहीय. त्यांचे खेळाडू सुद्धा जास्त वनडे क्रिकेट खेळलेले नाहीत. पण क्रिकेटमध्ये काहीच सांगता येऊ शकत नाही. कदाचित नेदरलँड्सची टीम आपल्या परफॉर्मन्सने पाकिस्तानला धक्का देऊ शकते. पाकिस्तानने पहिला सामना जिंकला, तर त्यानंतरचे 8 सामने त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असतील. पाकिस्तान टीमचा सध्याचा परफॉर्मन्स आणि टीम बॅलन्स पाहता, ही टीम वर्ल्ड कपमध्ये फार काही करेल, असं वाटत नाहीय.
पाकिस्तान टीममध्ये अशा कुठल्या पाच कमतरता आहेत, ज्यामुळे बाबर अँड कंपनी वर्ल्ड कप जिंकू शकत नाही, असं आम्ही म्हणतोय. वर्ल्ड कप सोडा, सेमीफायनलपर्यंत पोहोचणही पाकिस्तानसाठी कठीण वाटतय. पण पाकिस्तानी टीम कमबॅकसाठी ओळखली जाते. एखाद-दुसऱ्या धक्कादायक पराभवानंतर ते उसळी घेऊन उठतात. मागच्यावर्षीचा टी 20 वर्ल्ड कप याच उत्तम उदहारण आहे. भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 खेळायला आलेल्या पाकिस्तानी टीममध्ये कुठल्या कमतरता आहेत, त्या बद्दल जाणून घेऊया.
पाकिस्तानची पहिली कमतरता
पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीला संघर्ष करावा लागतोय. फखर जमाँ फेल झाला. पण तेच अब्दुल्लाह शफीकने सुद्धा फार काही केलं नाही. इमाम उल हकने बऱ्याच कालावधीपासून चांगल्या टीम विरुद्ध धावा केलेल्या नाहीत. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्टेजवर पाकिस्ताला याची किंमत चुकवावी लागू शकते.
दुसरी कमतरता
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी संपूर्ण टीमच योगदान आवश्यक आहे. बॅटिंग युनिटने चांगली कामगिरी करण आवश्यक आहे. पण पाकिस्तानी टीमची बॅटिंग बाबर आणि रिझवानवर अवलंबून आहे, असं दिसतय. वॉर्मअप मॅचेसमध्ये बाबर आणि रिझवानने अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले. पण दुसरे फलंदाज धावा करत नाहीयत.
तिसरी कमतरता
पाकिस्तानी टीममध्ये मधल्याफळीत फक्त इफ्तिखार अहमद काहीप्रमाणात प्रभावित करु शकलाय. पण सलमान आगाने निराश केलय. सऊद शकील टॅलेंटेड प्लेयर आहे. पण त्याच्याकडे अनुभव नाहीय.
चौथी कमतरता
पाकिस्तानी स्पिनर्सची सध्या वाईट अवस्था आहे. शादाब खान आणि मोहम्मद नवाजचे चेंडू वळत नाहीयत तसेच ते धावा सुद्धा रोखू शकत नाहीयत. उसामा मीरने आपल्या लेग स्पिनने प्रभावित केलय. पण दव पडल्यानंतर तो कशी गोलंदाजी करणार?. शक्तीच बनली दुर्बलता
वर्ल्ड कप सुरु होण्याआधी पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी जगात सर्वोत्कृष्ट आहे, असं म्हटलं जात होतं. पण आशिया कपमध्ये हा भ्रम दूर झाला. शाहीन शाह आफ्रिदी असो किंवा हॅरिस रौफ सगळ्यांची धुलाई झाली. आता नसीम शाहच्या दुखापतीनंतर पाकिस्तानी टीमची वेगवान गोलंदाजी कोलमडली आहे. भारतीय खेळपट्टयांवर आफ्रिदी आणि रौफ दोघांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच वॉर्मअप मॅचमध्ये दोघांची चांगलीच धुलाई झाली.